प्राणलिंग स्वामी : समाधी मठ गोशाळेसाठी ४ टन ऊस अर्पण
निपाणी (वार्ता) : येथील टायगर ग्रुपतर्फे बुधवारी (ता.२३) सायंकाळी शहरामध्ये व्यापरी दुकांदार यांनी लक्ष्मी पूजनासाठी ऊस पूजले होते. तसेच दुकान सजावटसाठीही ऊसाचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता. दुसऱ्या दिवशी ते ऊस टाकून दिले जातात. हे समजतच टायगर ग्रुपाचे जिल्हा अध्यक्ष मेघनाथ मोडीकर व त्यांचे कार्यकर्तेनी श्री चिकोडी रोडवरील विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी व गोरक्षक सागर श्रीखंडे यांच्या सोबत चर्चा करून ऊस गोळा करणाचे नियोजन केले यावेळी गोरक्षक सागर श्रीखंडे यांनी गाडी उपलब्ध करून दिली यावेळी निपाणी शरातील विविध दुकानामधून पूजेसाठी वापरलेले ४ टन ऊस हे टायगर ग्रुप यांच्या कार्यकर्ते यांनी गोळ्या करून श्री विरुपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेला अर्पण केले यावेळी समाधी मठाचे प्राणलिंग स्वामी यांच्याकडे सुपूर्द केले.
प्राणलिंग स्वामी यांनी, गाय ही हिंदू साठी पवित्र मानली जाते. पण आज हिंदू त्यांच्या पासून दूर होत चालला आहे. हीच परिस्थिती राहिली तर भविष्यात गाय आपल्या पीढीला चित्रात दाखवावी लागेल. गाईचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. आयुर्वेदात गाईला महत्वाचे स्थान आहे. जर घरी गाय असले तर त्यांना कोणतच त्रास होणात नाही. घरातील वातावरण सात्विक राहते. घरोघरी गाई सांभाळल्या पाहिजेत असे आव्हान प्राणलिंग स्वामीजी यांनी केले.
यावेळी गोरक्षक सागर श्रीखंडे म्हणाले, वसुबारस निमित्त शेकडो हिंदूंनी व्हाटसप फेसबुक वर स्टेट्स, पोस्ट केल्या. पण गोरक्षण, गोसंवर्धन, करण्यासाठी कृतीत दिसत नाहीत. ही मोठी हिंदूची शोकांतिका आहे. सोशल मीडियावर फक्त गोमातेसाठी प्रेम न दाखवता कृतीतून गोसवर्धनासाठी प्रत्येकाने करायला हवे. तरच गोमातेचे रक्षण होईल. ज्यांना गोमातेसाठी सेवा करायची असेल किंवा काही मदत करायची असेल त्यांनी समाधी मठ गोशाळेला भेट द्यावी. किंवा आम्हाला कळवावे असे सांगितले.
यावेळी टायगरच्या विविध उपक्रमची माहिती प्राणलिंग स्वामीजीना करून देण्यात आली. यावेळी टायगर ग्रुपचे अभिनंदन केले. या उपक्रमाचे विविध स्तरामधून कौतुक केले जात आहे. यावेळी टायगर ग्रुपाचे अमित चौगूले, राज मोडिकर, अर्जुन मोडिकर, संतोष मोडिकर, दिपक चव्हण, विजय शिंदे, लखन मोडीकर, अक्षय कांबळे, सुनील मोडिकर, ओमकार मोडिकर, राहुल मोडिकर, रोहीत शिंगाडे, रोहीत मोडिकर, कृष्णा भुयार, अजय चौगूले यांनी ऊस संकलन करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta