चार लाखाहून अधिक नुकसान : शेतकरी अडचणीत
निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे बोरगाव येथील सुमारे तीन एकर ऊसाला अचानक आग लागल्याने चार लाखावर अधिक नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी घडली. हुपरी रस्ता लगत असलेल्या संदीप माळी यांचे दोन एकर तर सतीश मधाळे यांचे एक एकरच्या ऊसाला शॉर्टसर्किट मुळे आग लागली.
सततचा अति पाऊस व महापुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आगीची घटना घडल्याने पुन्हा हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शुक्रवारी सायंकाळी सुमारे साडेसहाच्या सुमारास माळी व मधाळे यांच्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. माहिती तातडीने सदलगा अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण या अगोदरच संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता.
ऊस तज्ञांचा मार्गदर्शन घेऊन संदीप माळी हे प्रत्येक वर्षी ऊस पिकवित असतात त्यांच्या ऊसाची शेती ही मित्रांसाठी आदर्श असते. पण अचानक शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत त्यांचा ऊस संपूर्ण खाक झाला आहे. तसेच मधाळे यांचाही संपूर्ण ऊस आगीत खाक झाला आहे. सुमारे चार लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. वारंवार शेतकऱ्यांवर मोठी संकटे येत आहेत. शासनाने शेतकरी वर्गाला आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta