बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून येत्या १ नोव्हेंबरला आयोजित काळ्या दिनाला विरोध करून तो हाणून पाडू अशी दर्पोक्ती कन्नड रक्षण वेदिकेच्या निपाणी तालुका अध्यक्ष कपिल कमते यांनी केली.
निपाणीत रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कपिल कमते यांनी सांगितले की, कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे आयोजित काळा दिन कार्यक्रम थांबवण्यासाठी निपाणी तालुका करवे शाखा सज्ज आहे. निपाणीच्या सीमेवर राज्योत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. जर म. ए. समितीने काळा दिन साजरा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कर्नाटकाच्या सीमेवर प्रवेश दिला जाणार नाही.
यावेळी माचीदेव भोसले, जयवंत पाटील, अविनाश टोंगरे, आनंद इळीगेर, विनोद कट्टीमणी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta