Monday , April 20 2026
Breaking News

गुजरातमध्ये पूल कोसळला, 400 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती

Spread the love

 

अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे चारशे लोक नदीत बुडाले आहेत.

मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

या दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे.”

About Belgaum Varta

Check Also

आदिचुंचनगिरी मठातील ‘नऊ तत्त्वे’ विकसित भारताचा मार्ग

Spread the love  पंतप्रधान नरेंद्र मोदी; आदिचुंचनगिरी येथे श्री गुरु भैरवैक्य मंदिराचे उद्घाटन बंगळूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *