Share
बालचमुंनी साकारले अनेक गड किल्ले : पाहण्यासाठी इतिहास प्रेमींची गर्दी
निपाणी(वार्ता) : दिवाळीनिमित्त निपाणी शहर आणि उपनगरात बाराच्या मुरली विविध प्रकारचे गडकिल्लेची प्रतिकृती साकारली आहे. ते पाहण्यासाठी इतिहास प्रेमींची गर्दी होऊ लागली आहे. येथील दलाल पेठ माणिक नगर परिसरातील विघ्नहर्ता तरूण मंडळ (व्हीटीएम बॉईज) च्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेल्या किल्ले राजगड या बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या किल्ले राजगड या किल्ला प्रतिकृतीचे उद्घाटन सरसेनापाती संताजी घोरपडे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंहराजे जयसिंगराव घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करून आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या जीवनपध्दतीचे संस्काराचे आणि संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज आहे. आजच्या पिढीला गड किल्ल्यांचा ईतिहास समजावा याकरीता या मंडळाचे कार्य आदर्शवत असून त्याचे अनुकरण इतरांनीही करावे असे सांगितले.
यावेळी निपाणी समाधिमठाचे प्राणलिंग स्वामी, युवा उद्योजक महालिंगेश कोठिवाले, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, युवा उद्योजक प्रवीण तारळे, उद्योजक राजाभाऊ माळी, बसवेश्वर पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनिल चनन्नावर यांनी स्वागत केले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित इतिहास प्रेमींना गड किल्ल्याची माहिती दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब तिप्पे, चंद्रकांत पाटील, राजशेखर पाटील, सागर भोसले, विनायक साळुंखे, संदीप इंगवले यांच्यासह मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Post Views:
373
Belgaum Varta Belgaum Varta