Saturday , October 19 2024
Breaking News

निपाणी ऊरूसाची तयारी पूर्णत्वाकडे

Spread the love
कमिटी अध्यक्ष बाळासाहेब सरकार : चंद्र दर्शनामुळे एक दिवस ऊरुस पुढे
निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरूस शनिवार (ता. ५) ते सोमवार (ता. ७) या काळात साजरा होणार होता. मात्र अखिल भारतीय चंद्रदर्शन कमिटीच्या सुचनेनुसार चंद्रदर्शन १ दिवस वेळाने झाल्याने ऊरूसाच्या तारखेत बदल करावा लागला आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणताही संभ्रम बाळगू नये. नव्या तारखेप्रमाणे ऊरूस रविवार(ता ६) ते मंगळवार (ता. ८) अखेर साजरा केला जाणार असून तयारी पूर्ण झाली असल्याची माहीती उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार यानी दिली. येथील चव्हाणवाड्यात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
बाळासाहेब सरकार म्हणाले, सोमवारपासून अभ्यंगस्नानाने उरुसाचे विधी सुरू आहेत. २६ पासून चव्हाणवाडा व दुर्गा देवस्थान येथे ताशा सनई वादनास सुरुवात झाली आहे. चव्हाण वारसांच्या हस्ते चुना चढविला असून शनिवारी (ता. ५) मंडप चढविला जाणार आहे. रविवारी (ता. ६) गंधरात्र असून गंध चव्हाणवाड्यातून मिरवणुकीने निघणार आहे. या दिवशीच बेडीवाल्यांचा उरूस आहे. सोमवारी (ता. ७) उरूस असून यादिवशी चव्हाणवाड्यातून येणारा गलेफ पहाटे चढविण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. ८) खारीकच उडीचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी (ता. १०) मानाचे फकीर यांची रवानगी व भंडारखाना, शुक्रवारी (ता. ११) पाकाळणी कार्यक्रम व गोडा नैवेद्य दाखवला जाणार आहे. उरूस काळात आतषबाजी होणार आहे. उरूसानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून यामध्ये ओपन गावगन्ना बैलगाडी, घोडा बैलगाडी, घोडागाडी शर्यती, कस्त्यांचे मैदान, कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. दर्गा सेवेकरी इम्तियाज मुजावर यांनी दर्गाहमध्ये अर्पन केलेल्या वस्तु पुन्हा बाहेर विकल्या जाऊ नयेत, यासाठी ते साहीत्य ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था केली आहे. दर्शनासाठी समोरील नगारखान्याच्या बाजूने पुरुष व महिलासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्याचे सांगीतले.
 यावेळी पृथ्वीराज देसाई -सरकार रणजीत देसाई-सरकार, संग्राम देसाई – सरकार, जयराम मिरजकर, सुभाष कांबळे, इम्तिहाज मुजावर, अविनाश पाटील, संभाजी मुगळे, शरद मळगे, दिलीप रावळ, प्रदीप रावळ, सनी साळुंखे, कृष्णात पिसे, बंडोपंत गंथडे यांच्यासह यात्रा कमिटी सदस्य व सेवेकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत उरुसाला प्रारंभ

Spread the love  धार्मिक कार्यक्रमासह शर्यती : कुस्ती मैदानाचेही आयोजन निपाणी (वार्ता) : येथील संत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *