Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

‘मिस्टर कर्नाटक बजरंगी -2025’ किताबचा मानकरी दावणगेरीचा राहुल मेहरवाडे; बेळगावचा रोनक गवस उपविजेता

  बेळगाव : धारवाड जिल्हा शरीर सौष्ठव संघटना, कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव व क्रीडा संघटना आणि पंचमुखी हनुमान कमिटी, हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘मिस्टर कर्नाटक बजरंगी -2025’ किताब दावणगेरीच्या राहुल मेहरवाडे याने हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे बेळगावचा रोनक गवस उपविजेतेपदाचा, तर उमेश गंगणे …

Read More »

बाजार गल्ली वडगाव श्रीसंत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्री अंबाबाई देवस्थान येथे दिपोत्सव

  बेळगाव : बाजार गल्ली वडगाव श्रीसंत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्री अंबाबाई देवस्थानमध्ये दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री अंबाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मीनाक्षी महेंद्रकर, देवेंद्र महेंद्रकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष चंद्रकांत हाशिलकर, मंदिराचे ट्रस्टी उपाध्यक्ष चंद्रकांत महेंद्रकर, मोहन कोपर्डे, संतोष …

Read More »

रयत गल्लीत पुन्हा एक म्हैस अचानक दगावली

  बेळगाव : रयत गल्लीतील युवा शेतकरी प्रदिप आनंदा बिर्जे यांची दुसऱ्या वेताची अलिकडेच विलेली म्हैस अचानक दगावल्याने सुमारे 80,000 रुपयाचे नुकसान झाले. सकाळी दुध काढून झाल्यावर पाणी, चारा घातले. परत दुपारीही गवत घातल्यावर खात असलेली म्हैस संध्याकाळी 4.30 च्या दरम्यान अचानक खाली कोसळली आणि गोठ्यातच दगावल्याने सदर कुटूंबाचे मोठे …

Read More »

घरफोडी प्रकरणातील चोरट्यास अटक दागिने जप्त

  बेळगाव : सह्याद्री नगर येथील घरातील दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडील 3.78 लाखांच्या किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्याची कारवाई एपीएमसी पोलिसांनी केली आहे. गविसिदप्पा मंजुनाथ हलसुर (वय 72 वर्षे) सध्या राहणार रा. रघुनाथ पेठ, ता. अनगोळ, मूळचे टिस्क उसगाव, ता. पोंडा, मडगाव, गोवा राज्य असे अटक केलेल्या …

Read More »

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हलगा-मच्छे बायपासचे काम पुन्हा सुरू

  जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन शेतकऱ्यांच्या बांधावर बेळगाव : उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. आज जिल्हाधिकारी कामाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपण विकासाचे विरोधक नसून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कायदेशीररित्या काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. उच्च …

Read More »

कसलेल्या जमिनीतून हुसकावल्याने शेतकऱ्यांचे बैलहोंगल तहसीलदारांविरोधात तीव्र आंदोलन

  बेळगाव : आपण कसलेल्या सुपीक कृषी जमिनीतून हुसकावून लावले जात असल्याचा आरोप करत बैलहोंगल तहसीलदारांविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विषारी औषधाची बाटली हातात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. हातात विषाची बाटली घेऊन धरणे धरलेल्या या शेतकरी कुटुंबांचे वास्तव्य बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील कडसगट्टी गावात आहे. ही शेतकरी कुटुंबे गेल्या …

Read More »

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट जाहीर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणी डॉक्टर शिवाजी कागणीकर यांना राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू सी एम त्यागराज यांनी ही माहिती आज सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. उद्या मंगळवारी सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीदान …

Read More »

राजहंसगडला रस्ते कामासाठी एक कोटी निधी मंजूर

  गावात बैठक घेऊन सर्वानुमते रस्ते करण्याचा निर्धार.. बेळगाव : राजहंसगड गावातील भंगी रस्त्यांची दुरवस्था झाली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून रस्त्यांची कामे रेंगाळली होती याची दखल बेळगांव ग्रामीण भागाच्या आमदार तसेच कर्नाटक राज्य महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर …

Read More »

सैन्यात भरती होण्यासाठी आलेल्या 800 उमेदवारांना दिला अल्पोपहार

  बेळगाव : बेळगावात सुरू असलेल्या टेरिटोरियल आर्मी (TA) बटालियन निवड प्रक्रियेसाठी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या तरुणांच्या मदतीसाठी शहरातील युवक पुढे सरसावले आहेत. फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि यंग बेळगाव फाऊंडेशनच्या सदस्यांनी सीपीईडी ग्राउंड परिसरात सैन्य भरतीसाठी आलेल्या सुमारे 800 उमेदवारांना बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या वाटून सेवा दिली. या उपक्रमात संतोष …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे कन्नड वंशाचे; कन्नड साहित्यिकाचे वादग्रस्त वक्तव्य

  बेळगाव : बेळगाव मध्ये कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शुद्ध कन्नड वंशाचे होते. ते लिंगायत होते, असे वादग्रस्त वक्तव्य कन्नड साहित्यिक वाय.आर. पाटील यांनी केले आहे. कर्नाटक राज्य विकास संघटनेने आज बेळगावातील कन्नड भवन येथे विद्यार्थी प्रतिभा पुरस्कार आणि कन्नड राज्योत्सव कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »