बेळगाव : अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाची बैठक आज सोमवारी दुपारी पार पडली. बैठकीत पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत चर्चा करण्यात आली. कॅम्प येथील भाई दाजिबा देसाई सभागृहामध्ये आयोजित या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा चिटणीस व माजी जिल्हा क्रीडा अधिकारी विलास नारायणराव घाडी (येळ्ळूर) हे होते. शे. का. पक्षाचा 73 …
Read More »LOCAL NEWS
‘त्या’ अपहरणकर्त्यांना शोधून कडक शिक्षा करा : क्रेडाई
बेळगाव: बेेेळगाव शहरातील उद्योजक मदनकुमार भैरप्पनावर यांचे अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांना त्वरित गजाआड करून कडक शिक्षा दिली जावी, अशी मागणी क्रेडाई बेळगाव या संघटनेने केली आहे. क्रेडाई बेळगावचे अध्यक्ष पी. एस. हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि पोलिस उपायुक्तांना सादर करण्यात आले. कणबर्गी रोड माळमारुती येथे …
Read More »बेळगाव युवा समिती व पिरनवाडी ग्रामस्थांच्यावतीने नागरी समस्यांसंदर्भात निवेदन सादर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि पिरनवाडी ग्रामस्थांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी यांना नागरी समस्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले.मागील काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरण करताना आणि विविध विकासकामे राबवताना जैतनमाळ, खादरवाडी, उद्यमबाग परिसरातून वाहणारे तिन्ही नाले पिरनवाडी येथे जोडण्यात आले आहेत, त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारा सर्व पाण्याचा प्रवाह पिरनवाडी याठिकाणी येऊन पिरनवाडी …
Read More »येडियुराप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार
संध्याकाळी होणार नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुराप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत. पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पुन्हा गोंधळ
नड्डांच्या वक्तव्यामुळे येडियुराप्पांच्या ‘सेफ’ची चर्चा बंगळूर : एकिकडे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या राजीनाम्याची क्षणगणना सुरू असतानाच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यात बोलताना येडियुराप्पा यांच्या कार्याचे कौतुक करून नेतृत्व बदलाचा प्रश्नच उत्पन्न होत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येडियुराप्पा जाणार कि राहणार? याविषयीचे गुढ कायम आहे. रविवारी (ता. …
Read More »बेळगाव ऑनलाईन मराठी साहित्य संमेलनात कवींची काव्य मैफिल रंगली बाहरदार …
बेळगाव : आपली काव्यरचना सादर करून त्यांनी सर्व कवीना दर्जेदार कविता लिहिण्याचे आव्हानेही केले. काव्य हे समाजमनाचे, वास्तवाचे, वेदनांचे, दुखांचे, आनंदाचे असते. त्या आपल्या भावना प्रतिभेच्या जोरावर ती व्यतीत केल्या पाहिजेत एक सुंदर काव्य निर्मिती करता आली पाहिजेत आणि कविला भावविश्व साकारता आले पाहिजेत. असे वणी यवतमाळ येथील कवी आनंद …
Read More »मीराबाई चानूला प्रसाद होमिओफार्माकडून मदत
बेळगाव : लाकडे गोळा करून संघर्ष करत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारी मीराबाई चानु हिला सरकारकडून मदत मिळतच आहे. बेळगावातील एका फार्मसी चालवणाऱ्या युवकाने देखील मदत देऊ करत अभिनंदन केले आहे. बेळगाव येथील प्रसाद होमिओफार्माचेप्रसाद घाडी यांनी पंतप्रधान कार्यालयाद्वारे पाच हजारांची मदत देऊन मीराबाई चानू हिचे अभिनंदन केले आहे. भारतात गरिबीतून संघर्षातून …
Read More »गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी
लोकमान्य टिळक गणेश महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन बेळगाव : बाप्पाच्या आगमनाला अवघा दीड महिना शिल्लक आहे. मात्र, गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारची भूमिका अजूनही अस्पष्टच आहे. साधेपणाने उत्सव साजरा करणे म्हणजे नेमका कसा साजरा करायचा, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. तरी, कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करण्यासाठीची नियमावली लवकर जाहीर करावी, …
Read More »श्रीराम सेनेतर्फे राबविण्यात आले डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण शिबीर
बेळगाव : श्रीराम सेना हिंदूस्थान यांच्यावतीने व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सहयोगाने आज आनंद नगर, वडगाव येथे डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्री शिव मंदिर विश्वस्त मंडळ, आनंद नगर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा परिसरातील जवळपास एक हजार लोकांनी लाभ घेतला. संघटनेचे …
Read More »बेळगाव सीमाभाग हा महाराष्ट्राचा आत्मा.. : खासदार संजय राऊत
मातृभाषेतून शिक्षण हा सर्वांचा नैसर्गिक आणि न्याय हक्क : संमेलनाध्यक्ष श्रीराम पचिंद्रे बेळगाव : “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झाला पाहिजे यासाठी हुतात्मे दिलेले आहेत, तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो. सीमाभागात मराठी संस्कृती नांदते आहे. सीमाभागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta