बेळगाव : नियती फाउंडेशनच्यावतीने कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत कार्यरत असणाऱ्या सदस्यांना रोगप्रतिकारक औषधांचे वितरण करण्यात आले.कोरोना काळात शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने सुरू असलेल्या कौतुकास्पद कार्याची दखल घेत तसेच जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने रात्रंदिवस घराबाहेर राहून सेवा बजावत असलेल्या शहापूर …
Read More »LOCAL NEWS
सीडी प्रकरण सरकारने सोडले तरी आम्ही सोडणार नाही : शिवकुमार
बेंगळुरू : सरकारने लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्वरित लसीकरण सुरु करावे. सरकारने सीडी प्रकरण सोडून दिले तरी आम्ही सोडणार नाही. या प्रकरणाचा पिच्छा पुरवून न्यायासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिला. यासदंर्भात हासन येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी राज्यात उदभवलेल्या कोरोना लसीच्या …
Read More »दिव्यांग व वृद्धांचे लसीकरण
बेळगाव : दिव्यांग, अंध आणि मतिमंद मुलांना तसेच वृद्धांना लस देण्याचा कार्यक्रमाला आ. अनिल बेनके यांनी चालना दिली. गुरुवारी शहरातील कोल्हापूर सर्कल जवळील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेमध्ये कोरोना लस देण्याच्या कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी आ. अनिल बेनके बोलतांना म्हणाले की बेळगावमध्ये कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी अंध, मतिमंद व दिव्यांग लोकांना लस …
Read More »हुबळीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक
हुबळी : येथील एका स्टेशनरी दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज घडली आहे. या दुकानाला लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आग विझवेपर्यंत दुकानातील बरेच साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान हुबळीतील विद्यानगर येथील रूपा स्टेशनरी शॉपला ही अगा लागली होती. यामध्या अनेक साहित्य …
Read More »विकेंड लॉकडाऊन काळात बँका बंद; एटीएम सुरू
बेळगाव : बेळगाव जिल्हाधिकऱ्यांनी तीन दिवस कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी 6 पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या काळात बँका बंद राहतील मात्र एटीएम सुरू राहणार आहेत, असे लीड बँकेचे व्यवस्थापकांनी सांगितले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे विकेंड लॉकडाऊनच्या कालमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. …
Read More »कर्नाटकात आणखी ४ ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
बंगळूर : कर्नाटकात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे राज्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केंद्र आणि कर्नाटक हायकोर्टाला पत्र पाठवून राज्याला मिळणार ऑक्सिजनचा वाटा पुरवण्यासंदर्भात मागणी केली होती. दरम्यान, आज कर्नाटकात ४ ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाल्या. या ४ ट्रेनच्या माध्यमातून ४३७ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन कर्नाटकात आला आहे. …
Read More »कर्नाटक : मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊन वाढीचे संकेत
बेंगळूर : राज्यात लॉकडाऊन वाढीबाबत चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी निर्यात व्यवसायांना परवानगी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला नसल्याने योग्य निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. राज्यात सध्या ७ जूनपर्यंत …
Read More »मनपा कर्मचाऱ्यांची लाॅकडाऊनसंदर्भात जनजागृती
बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाला थोपविण्यासाठी सरकारने येत्या शुक्रवारपासून लागू केलेल्या सलग तीन दिवसांच्या कडक लाॅकडाऊनसंदर्भात मनपा आयुक्तांच्या आदेशावरून आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रभाग क्र. 20 आणि 21 मध्ये जनजागृती मोहीम राबविली.महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छता निरीक्षक संजय पाटील व नितिन देमट्टी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मार्शल्सनी येत्या दि. …
Read More »प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणावर नियुक्ती
बेळगाव (प्रतिनिधी) : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख आणि कला शाखेचे डीएन प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची नियुक्ती कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणवर सदस्य म्हणून कर्नाटक सरकारने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कायदा सेवा प्राधिकरण कार्यरत आहे या मंडळावर समाजातील विविध स्तरातून समाजशील …
Read More »सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करा : जिल्हाधिकारी हिरेमठ
बेळगाव : बेळगावातील कोविड इस्पितळाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बुधवारी खासगी इस्पितळ संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठक घेतली. सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. बेळगावातील कोविड रुग्णांना दिले जाणारे उपचार, इस्पितळांतील सुविधा, उपचारांसाठी आकारले जाणारे शुल्क व अन्य विषयांवर चर्चा करून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta