बंगळूर : कर्नाटकात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे राज्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केंद्र आणि कर्नाटक हायकोर्टाला पत्र पाठवून राज्याला मिळणार ऑक्सिजनचा वाटा पुरवण्यासंदर्भात मागणी केली होती. दरम्यान, आज कर्नाटकात ४ ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाल्या. या ४ ट्रेनच्या माध्यमातून ४३७ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन कर्नाटकात आला आहे. या ४ ऑक्सिजन एक्सप्रेस विशेष गाड्या व्हाइटफील्डच्या इनलँड कंटेनर डेपोवर पोहोचल्या आहेत.
पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात ऑक्सिजन पाठवत आहे. आजपर्यंत एकूण २३ ऑक्सिजन एक्सप्रेस राज्यात पोहोचल्या आहेत. दरम्यान राज्याला भासणारी ऑक्सिजनची कमतरता या ४ ऑक्सिजन एक्सप्रेसमुळे काही अंशी कमी होणार आहे. या पुढेही राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे.
दरम्यान कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत असली तरी आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी कमी झालेली नाही. नव्याने संसर्ग होणाऱ्या अनेक रुग्णांना उपचारासाठी आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता भासत आहे. व्हेंटिलेटरवरसाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता असते. राज्यात हा ऑक्सिजन पुरवठा मागणीपेक्षा कमी झाला आहे.