Sunday , July 26 2026
Breaking News

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love

 

बेळगाव : लग्नाच्या आनंदाला अवघा महिना उलटत असतानाच एका नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना बेळगाव शहरात घडली आहे. महाद्वार रोड परिसरातील अष्टेकर गल्ली येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रक्षिता पुजारी (वय २९) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह मंजुनाथ कृष्णा पुजारी याच्यासोबत नुकताच झाला होता. रक्षिता एका खासगी कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करत होती, तर तिचा पती उद्यमबाग येथील एका कंपनीत नोकरी करतो.

मंगळवारी सकाळी पती नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर रक्षिताने आपल्या आईशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. त्यानंतर तिने घराचा दरवाजा आतून बंद करून छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले आहे.

दुपारी पती मंजुनाथ घरी परतल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीतून घरात पाहिले. त्यावेळी रक्षिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रुक्मिणी ए. आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

अवघ्या महिनाभरापूर्वी नव्या संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणीच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *