Sunday , April 5 2026
Breaking News

LOCAL NEWS

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा खटल्यांची सुनावणी लांबणीवर

  बेळगाव : काल दि. १८ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवरील एकूण सहा खटल्यांची बेळगाव न्यायालयात सुनावणी होती. साक्षीदारांच्या गैरहजेरीमुळे सर्व खटले पुढे ढकलण्यात आले. सकाळपासूनच न्यायालयीन आवारात समिती कार्यकर्त्यांची वर्दळ पाहावयास मिळाली. खटल्यातील साक्षीदार गैरहजर राहिल्यामुळे सर्वच खटले तहकूब करून पुढील तारीख निश्चित करण्यात आली. 2021 च्या महामेळाव्याच्या खटल्यात …

Read More »

नियमित बससेवेसाठी अतिवाड ग्रामस्थांचे परिवहन विभागावर मोर्चा

  बेळगाव : दोन वर्षांपासून अतिवाड गावाला अनियमित बस सेवा असल्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजसाठी ये-जा करणे कठीण झाले आहे. अनियमित बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी परिवहन विभागा विरोधात मोर्चा काढत रास्तारोको केले. यादरम्यान परिवहन विभागाच्या प्रतिनिधींना जाब विचारल्यानंतर गावात शौचालयाची सुविधा नसल्याने …

Read More »

अमन नगर येथे तीन तरुणांचा गुदमरून मृत्यू

  बेळगाव : थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या कोळशाच्या शेकोटीमुळे तिघांचा श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील अमन नगर येथे घडली आहे. अमन नगर भागात एका खोलीत चार भावंडे वास्तव्यास होती. सध्या बेळगावात थंडीचा जोर वाढला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी खोलीमध्ये कोळशाची शेगडी पेटवण्यात आली होती. रात्री झोपताना …

Read More »

काळविट मृत्यू प्रकरण; भूतरामहट्टीसह परिसरातील गावांना खबरदारी घेण्याची सूचना

  बेळगाव : राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील एकापाठोपाठ एक 31 काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 13 नोव्हेंबरपासून प्राणी संग्रहालयातील काळवीट एका पाठोपाठ एक मृत्युमुखी पडल्याची घटना घडत होती. मृत काळविटांच्या मृतदेहाची तपासणी करून सादर केलेल्या प्राथमिक अहवालात सदर काळविटांचा मृत्यू ‘हेमोरेझीक सेप्टीसेमिया’ नावाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला …

Read More »

सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेजमध्ये एनएसएस शिबिराची सांगता

  बेळगाव : सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेज शहापूर डीडी 0024 बेळगावच्या एन. एस. एस. वार्षिक विशेष शिबिराची सांगता झाली. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून चिंतामणी कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती विजया नाईक, समाज शास्त्राचे प्राध्यापक एस. एस. हिरेमठ सर, कॉलेजच्या लायब्ररीएन सविता गुड्डीन मॅडम, कॉलेजच्या एफ. …

Read More »

कंग्राळी बुद्रुकमध्ये ४.५० कोटी रुपयांच्या विविध रस्त्यांच्या विकासकामांचे उद्घाटन

  बेळगाव : कंग्राळी बुद्रुक गावात ४१ वर्षांनंतर होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, ४.५० कोटी रुपये खर्चून विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी बोलताना हे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, यात्रेपूर्वी रस्ते आणि गटारे सुधारली जातील. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था …

Read More »

काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आदेश

  बेळगाव : भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील एकूण 31 काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वन विभागाच्या डीएफओ आणि आरएफओ यांना दिले आहेत. कुवेंपू नगर येथील प्राणी संग्रहालय विकास प्राधिकरण अध्यक्ष रंगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, राणी चन्नम्मा …

Read More »

श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजच्या शाश्वत वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

  बेळगाव : आधार एज्युकेशन सोसायटीच्या श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बेळगाव यांच्या शाश्वत या वार्षिक क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध राष्ट्रीय कुस्तीपटू कामेश पाटील यांनी केले. स्वागत भाषण के. सानिका यांनी केले.डॉ. संदीप पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विनोद …

Read More »

विनोद मेत्री याची ‘मिस्टर युनिव्हर्स -2025’ स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : अनगोळ, बेळगाव येथील होतकरू शरीर सौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याची जर्मनी येथे होणाऱ्या ‘मिस्टर युनिव्हर्स -2025’ या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय चमूत अभिनंदनीय निवड झाली आहे. अनगोळ येथील रहिवासी दिवंगत पुंडलिक मेत्री यांचा चिरंजीव असलेल्या विनोद याला व्यायाम आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत वडिलांचे नेहमीच प्रोत्साहन लाभले. विनोद …

Read More »

शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याशी गप्पा टप्पा कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव शाखा आणि प्रगतिशील लेखक संघ बेळगाव यांच्यासाठी गप्प टप्पा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला सर्व कार्यकर्त्यांनी आपापली ओळख करून दिली. त्यानंतर अंनिसचे बेळगाव …

Read More »