Thursday , June 4 2026
Breaking News

शहरातील सरकारी कार्यालयांवर लोकायुक्तांचे धाडसत्र सुरूच

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील सरकारी कार्यालयांवर लोकायुक्तांचे धाडसत्र सुरू असल्यामुळे बेळगाव शहरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. बेळगाव शहरातील सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चालू असल्याची तक्रार वारंवार होत होती. या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयांवर धाडसत्र मोहीम सुरू केली आहे. बेळगाव स्मार्ट सिटी कार्यालय, महानगरपालिका, उपनिबंधक कार्यालय, तालुका पंचायत त्याचबरोबर विविध सरकारी कार्यालयांमध्ये लोकायुक्तांनी छापे घातल्यामुळे संबंधित खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तालुका पंचायत कार्यालयात लोकायुक्तांनी धाड टाकून सकाळी 11 ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्व विभागाची कसून तपासणी केली. याव्यतिरिक्त बेळगाव महानगरपालिका स्मार्ट सिटी कार्यालयात देखील चौकशी सुरू आहे या चौकशी अंति भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे बेळगाव असल्याचे लक्ष लागून राहिले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *