Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

कोनेवाडीत भगवा फडकवल्याप्रकरणी उर्वरित चौघांनाही जामीन

  बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांनी लाल -पिवळा कन्नड ध्वज फडकवल्याच्या निषेधार्थ कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे भगवा ध्वज फडकावून ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देऊन मराठी व कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणाच्या खटल्यातील वॉरंट जारी केलेल्या 5 जणांपैकी शिवसेना नेते विजय शामराव देवणे यांना यापूर्वीच जामीन मंजूर …

Read More »

मारहाणीच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता

  बेळगाव : साक्षीदारातील विसंगतीमुळे मारहाण करून हातोड्याने वार केल्याच्या आरोपातून चौथे जेएमएफसी न्यायालयाने कंग्राळी खुर्द येथील एकाची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्याचे नाव सिद्धार्थ चंद्रकांत चौगुले (वय 25, रा. महादेव रोड, कंग्राळी खुर्द ता. जि. बेळगाव) असे आहे. प्रकरणाची माहिती अशी की, संशयित सिद्धार्थ चौगुले याने …

Read More »

राणी चन्नम्मा विद्यापीठाला प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’

  बेळगाव : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाला भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’ देऊन नुकताच आयआयटी मुंबई येथे गौरविण्यात आले आहे. पुरस्काराचा स्वीकार करून बोलताना राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांनी सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून विद्यापीठ समाजाच्या शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना …

Read More »

बेंगळुरूमधील ४० खाजगी शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

  बंगळूर : शहरातील शाळांना बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल येणे सुरूच आहे, केंगेरी आणि राजराजेश्वरी नगरसह शहरातील ५० हून अधिक खासगी शाळांना आज सकाळी समाजकंटकांकडून बॉम्बच्या धमक्यांचे ईमेल आले. मात्र हे दमक्यांचे ईमेल खोटे असल्याचे तपास केल्यानंतर पोलिसांनी सांगितले. सकाळी ७.२४ वाजता roadkill333@atomicmail.io या वापरकर्त्याकडून ‘शाळेत बॉम्ब’ या विषयाचा एकच, समान …

Read More »

डीसीपी पदाचा पदभार एन. व्ही. बरमणी यांनी स्वीकारला!

  बेळगाव : बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्थेचे नवीन डीसीपी म्हणून एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. बेळगावला एक उत्तम आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी सेवा देण्याचे आश्वासन डीसीपी एन. व्ही. बरमणी यांनी दिले. बेळगाव कायदा व सुव्यवस्थेचे नवीन डीसीपी म्हणून एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. धारवाड जिल्ह्याचे …

Read More »

स्वीमर्स क्लबच्या जलतरणपटूंची राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी

  बेळगाव : कर्नाटक जलतरण संघटनेच्यावतीने नुकत्याच आयोजित केलेल्या एनआरजे राज्य उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2025 -26 मध्ये स्विमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश मिळवताना 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदके जिंकली आहेत. कॉर्पोरेशन स्विमिंग पूल (बीएसी) बसवनगुडी, बेंगलोर येथे गेल्या 9 ते 13 जुलै 2025 …

Read More »

कोलकातामध्ये तरुणीवर बलात्कार प्रकरणी बागलकोटमधील तरुणाला अटक

  बागलकोट : कोलकातामधील एका तरुणीला वसतिगृहात बोलावून बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी बागलकोट येथील एका तरुणाला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव परमानंद टोपनावर असे आहे. तो लोकापुराचा रहिवासी आहे. तो कोलकातामधील जोका येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एमबीएच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. तरुणीने आरोप केला आहे की …

Read More »

मराठा मंडळ आयोजित आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

  बेळगाव : शिक्षण महर्षी कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांचा पुण्यस्मरण दिवस हा शैक्षणिक उपक्रम दिन म्हणून गेली एकोणीस वर्षे साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून, मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. सौ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील आंतरशालेय वकृत्व स्पर्धा …

Read More »

कन्नडसक्तीची अंमलबजावणी तीव्र करण्याची करवेची मागणी

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून महानगरपालिकेत कन्नडविरोधी किंवा कन्नडचा अपमान केल्यास कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते पालिकेला घेराव घालून त्यांना धडा शिकवतील, असा कर्नाटक रक्षण वेदिके (नारायणगौडा गट)ने इशारा दिला आहे. गुरुवारी, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांची …

Read More »

संत मीरा अनगोळ शाळेला सर्वसाधारण विजेतेपद

  बेळगाव : नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा गणेशपुर हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय अथलेटिक प्राथमिक मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 223 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने 173 गुणासह उपविजेते तर शिंदोळीच्या देवेंद्र जीनगौडा शाळेने 115 गुणासह तिसऱ्या स्थानावर …

Read More »