Monday , September 21 2026
Breaking News

डीसीपी पदाचा पदभार एन. व्ही. बरमणी यांनी स्वीकारला!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्थेचे नवीन डीसीपी म्हणून एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. बेळगावला एक उत्तम आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी सेवा देण्याचे आश्वासन डीसीपी एन. व्ही. बरमणी यांनी दिले.
बेळगाव कायदा व सुव्यवस्थेचे नवीन डीसीपी म्हणून एन. व्ही. बरमणी यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असलेले बरमणी यांना राज्य सरकारने बेळगाव डीसीपी म्हणून नियुक्त केले होते. त्यानुसार, शहर पोलीस आयुक्त कार्यालयात डीसीपी निरंजन राजे अरास यांनी त्यांना पदभार सोपवला. कर्नाटक सरकारने बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था उपायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती केली असून, आज त्यांनी पदभार स्वीकारला. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि जनतेच्या सहकार्याने बेळगावला एक उत्तम आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी सेवा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *