Wednesday , December 17 2025
Breaking News

LOCAL NEWS

विधिज्ज्ञ हरिष साळवे मांडणार सीमाप्रश्नी बाजू; महाराष्ट्र सरकारकडून पाठपुरावा

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापूर येथे आंदोलन करताच महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या दाव्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आता सीमाप्रश्नाच्या दाव्यात पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिष साळवे सीमावासीयांची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे दाव्याला बळकटी आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात २००४ पासून खटला प्रलंबित आहे. या दाव्यात विधिज्ज्ञ …

Read More »

एरो इंडियाचे उद्यापासून चित्तथरारक प्रदर्शन

  आशियातील सर्वात मोठे एरोस्पेस प्रदर्शन बंगळूर : शहरातील येलहंका हवाई तळावर १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या एरोस्पेस प्रदर्शन, एअरो इंडिया २०२५ साठी मंच सज्ज झाला आहे. द्वैवार्षिक एअरो इंडिया शोच्या १५ व्या आवृत्तीत नवीनतम अत्याधुनिक वैमानिक तंत्रज्ञानाचे उद्या (ता. १०) अनावरण केले जाईल. बहुतेक स्वदेशी …

Read More »

अपघातातील मृतांवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

  बेळगाव : बेळगावहून कुंभमेळ्यासाठी निघताना अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेळगावमधील चार जणांचे मृतदेह आज बेळगावात पोहचले. इंदोरच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगावात पोहोचलेले पार्थिव बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी आणि मृतांच्या कुटुंबियांनी स्वीकारले. बेळगावहून सुमारे १८ जण कुंभमेळ्यासाठी रवाना झाले होते. ८ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यात कॅन्टर, टीटी आणि दुचाकी यांच्यात साखळी अपघात …

Read More »

मराठी विद्यानिकेतनतर्फे प्रा. सुरेश पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती पि.यू. कॉलेज येथील मराठी विषयाचे प्राध्यापक श्री सुरेश पाटील हे 31 जानेवारी रोजी आपल्या 35 वर्षाच्या प्राध्यापकी सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे त्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या शुभेच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे …

Read More »

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान संपन्न

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या वतीने आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन मराठी विद्यानिकेतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश पाटील सर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक श्री. इंद्रजीत मोरे …

Read More »

पोर्णिमे पुर्वीच श्री रेणुका देवी यात्रेसाठी यल्लमा डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी

  सौंदती : सालाबादप्रमाणे या वर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची भरत पोर्णिमा यात्रा बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. दरम्यान यात्रेपूर्वीच चार दिवस अगोदर यल्लामा डोंगर डोंगरावर भाविकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पौर्णिमा यात्रेपूर्वीच लाखो भाविक भरत पौर्णिमा यात्रेसाठी यांना डोंगरावर …

Read More »

बाग परिवाराचा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

  बेळगाव : बाग परिवाराचा फेब्रुवारी महिन्यातील कार्यक्रम शनिवार दि. 8 रोजी किर्लोस्कर रोडवर येथील जत्तीमठामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने पार पडला. जवळजवळ वीस कवींनी आपल्या कविता बहारदारपणे सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सुरूवातीस अक्षता येळूरकरने “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा” हे भक्ती गीत गायिले. वेगवेगळ्या विषयावरील …

Read More »

अपघातातील मृत भाविकांचे शव उद्या बेळगावात

  बेळगाव : महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन प्रयागराज येथून भाविक बेळगावला परतताना ट्रॅव्हलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरने प्रथम एका दुचाकीला ठोकरून त्यानंतर रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावातील 4 भाविकांचा मृत्यू झाला. त्यांचे शव उद्या रविवारी सकाळी बेळगावात दाखल होणार आहेत या अपघातात मृत झालेले सागर परसराम शहापूरकर …

Read More »

बैलहोंगल तालुक्यात विहिरीत आढळला अज्ञात मृतदेह

  बैलहोंगल : बैलहोंगल (जि. बेळगाव) तालुक्यातील जालिकोप्प गावातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जालिकोप्प गावातील बोलशेट्टी यांच्या घरा लगतच्या विहिरीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. मयताचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे यादरम्यान आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. …

Read More »

रामतीर्थनगर येथे इसमाचा खून; पत्नीवर संशय

  बेळगाव : रामतीर्थनगर येथे एका इसमाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून त्याचा खून त्याच्या पत्नीनेच केला असल्याचा कयास आहे. खून झालेल्या इसमाचे नांव चिक्कोडी तालुक्यातील अमित रायबाग असे आहे. तो आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. या प्रकरणातील संशयित ही त्याचीच पत्नी असून तिला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले …

Read More »