बेळगाव : महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन प्रयागराज येथून भाविक बेळगावला परतताना ट्रॅव्हलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हलरने प्रथम एका दुचाकीला ठोकरून त्यानंतर रस्त्याकडेला थांबलेल्या टँकरला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात बेळगावातील 4 भाविकांचा मृत्यू झाला. त्यांचे शव उद्या रविवारी सकाळी बेळगावात दाखल होणार आहेत
या अपघातात मृत झालेले सागर परसराम शहापूरकर (वय 45) रा. होसुर शहापूर, नीता भाऊराव बडमंजी (वय 50) रा. क्रांतीनगर, ज्योती प्रकाश खांडेकर (वय 60) आनंद नगर वडगाव, संगीता चंद्रकांत तेली (वय 40) शिवाजीनगर अशी मृतांची नावे आहेत.
हे सर्व पार्थिव एकत्रित बेळगावला दाखल होणार असून सकाळी दहा वाजेपर्यंत या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जाणार आहे. हे मृतदेह मध्यप्रदेश मधील प्रशासनाने आणण्यासाठी मदत केली आहे.