Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनतर्फे प्रा. सुरेश पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सोहळा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती पि.यू. कॉलेज येथील मराठी विषयाचे प्राध्यापक श्री सुरेश पाटील हे 31 जानेवारी रोजी आपल्या 35 वर्षाच्या प्राध्यापकी सेवेतून निवृत्त झाले. त्यानिमित्त मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे त्यांचा शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या शुभेच्छा समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर हे होते. श्री. सुभाष ओऊळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सुरेश पाटील यांच्या प्राध्यापिकी कारकिर्दीचा व मराठी भाषेतील कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री. गजानन सावंत यांनी केले. प्राध्यापक सुरेश पाटील हे मराठी विषयाचे उत्तम प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते कर्नाटक राज्य पुस्तक अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. पुरोगामी विचारांचा एक पाईक म्हणून त्यांची ओळख आहे. आपल्या कृतीतून वागण्यातून ते जसे बोलावे तसे कृती करताना दिसतात. आपल्या 35 वर्षाच्या कार्यकीर्दीत प्राध्यापक असून सुद्धा ते नेहमी कॉलेजला सायकल वरून येत होते. पर्यावरण पूरक वागणुकीचा संदेश ते यातून द्यायचे. मुलांमध्ये सामाजिक भान रुजवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असायचे.दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित महात्मा फुले अध्ययन केंद्र, दाजीबा देसाई प्रतिष्ठान, एस वाय पाटील पुरोगामी सेवादल, गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी अशा विविध संस्थांमध्ये ते मार्गदर्शक संचालक म्हणून कार्यरत आहेत. कर्नाटक राज्य पुस्तक मंडळाच्या निमित्ताने पीयूसीचे मराठी पुस्तक व इयत्ता नववी -दहावी द्वितीय भाषा मराठी पुस्तक निर्मिती मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या प्राध्यापकी पेशात निस्वार्थी वृत्तीने विद्यादान करण्याचे काम केले आहे. ज्योती महाविद्यालयात गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना अमलात आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. या त्यांच्या प्राध्यापकी पेशाच्या कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीतर्फे शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. सरांच्याबद्दल कृतज्ञता श्री. नारायण उडकेकर यांनी व्यक्त केली, तर आभार प्रदर्शन नीला आपटे यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *