Sunday , September 20 2026
Breaking News

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलाची मोठी कारवाई; 12 नक्षलवादी ठार

Spread the love

 

मुंबई : गेल्यात काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांवर कारवाई केली जात आहे. त्यातच आज छत्तीसडगडमधील विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले आहेत. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे चार जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी सकाळी विजापूर आणि नारायणपूरच्या महाराष्ट्र सीमेवर असलेल्या इंद्रावती नॅशनल पार्क परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवांद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यात १२ नक्षलवादी ठार झाले आहेत.

अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त
बस्तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत ठार झालले्या नक्षलवाद्यांची संख्या जास्त असू शकते. सध्या या परिसरात शोधमोहीम सुरु आहे. या चकमकीच्या ठिकाणी अनेक स्वयंचलित शस्त्रे सापडली असून ती जप्त करण्यात आली आहेत.

About Belgaum Varta

Check Also

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ११ कामगारांचा मृत्यू

Spread the love    कारखाना जमीनदोस्त; अनेक जण गंभीर जखमी, बचावकार्य सुरू कौशांबी (उत्तर प्रदेश) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *