बेळगाव : रामतीर्थनगर येथे एका इसमाचा खून झाल्याचे उघडकीस आले असून त्याचा खून त्याच्या पत्नीनेच केला असल्याचा कयास आहे.
खून झालेल्या इसमाचे नांव चिक्कोडी तालुक्यातील अमित रायबाग असे आहे. तो आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. या प्रकरणातील संशयित ही त्याचीच पत्नी असून तिला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.