बैलहोंगल : बैलहोंगल (जि. बेळगाव) तालुक्यातील जालिकोप्प गावातील एका विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
जालिकोप्प गावातील बोलशेट्टी यांच्या घरा लगतच्या विहिरीत एक अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. मयताचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे यादरम्यान आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी तालुका रुग्णालयात पाठवून दिला.
यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. सदर घटनेची बैलहोंगल पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.