बेळगाव : कुरुक्षेत्र हरियाणा येथे 28 ते 2 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघ गुरुवार तारीख 26 रोजी सायंकाळी गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसने रवाना झाले आहेत. या संघाला शाळेचा माजी विद्यार्थी ओमकार देसाई यांनी फुटबॉल …
Read More »LOCAL NEWS
शाळेतील दत्तक योजनेसाठी दिली आर्थिक मदत
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी ज्योती कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका सौ. ज्योती मधुकर मजुकर, श्रीमती कस्तुरी अशोकराव पवार, सौ नीलम शिवाजीराव नलावडे यांनी रोख रुपये 60000/- (साठ हजार रुपये) देणगी दिली आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील, खजिनदार एन. …
Read More »सुवर्णलक्ष्मी सोसायटीला 46 लाखाचा निव्वळ नफा
बेळगाव : येथील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीला गेल्या आर्थिक वर्षात 46 लाख 6 हजार रुपयाचा निव्वळ नफा झाला असून या सोसायटीकडे 20 कोटी 62 लाख रुपयाच्या ठेवी आहेत. तर सोसायटीने आपल्या सभासदांना 17 कोटी 66 लाख रुपयाच्या कर्जाचे वाटप केले आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल शिरोडकर …
Read More »नैतिकता स्वीकारून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा द्यावा; निजदची बेळगावात निदर्शने
बेळगाव : मुडा घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, जर राजीनामा दिला नाही तर निजद तीव्र लढा देत राहील, असा इशारा निजदचे शंकर माडलगी यांनी दिला. उच्च न्यायालय आणि लोकप्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशानंतर मुडा घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा …
Read More »ऑक्टोबर महिन्यापासून बेळगाव शहरातील रिक्षांना मीटरसक्ती लागू
बेळगाव : ऑक्टोबर महिन्यापासून बेळगाव शहरातील रिक्षांना मीटरसक्ती लागू करण्यात येईल त्याचबरोबर मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी रिक्षातून ने-आण करणाऱ्या रिक्षाचालकांचा वाहन परवाना देखील रद्द करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. आजपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनधारकांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द केल्याचा तपशील सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक परिवाहन …
Read More »शहापूरात हनीट्रॅपचा प्रकार; युवतीसह चौघांना अटक
बेळगाव : आजारी असल्याने हात धरून उठवत असतानाचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देऊन 15 लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून चौघांना जेरबंद केले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, विनायक सुरेश कुरडेकर रा. मंगळवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव यांनी आपल्या ओळखीच्या दिव्या प्रदीप सपकाळे (रा. बसवाण गल्ली शहापूर) …
Read More »साठे प्रबोधिनीच्या मराठी पत्रलेखन स्पर्धा संपन्न
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव तर्फे बेळगाव परिसरातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे मराठी भाषा शिक्षण अर्थपूर्ण व आनंददायी व्हावे, त्यांचे लेखन-वाचन कौशल्य विकसित व्हावे, विचार अभिव्यक्तीला वाव मिळावा यासाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व इयत्ता …
Read More »बेळगाव जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत असलेल्या ठिकाणांची ओळख पटवून अशा ठिकाणांची दुरुस्ती करून अपघात नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते …
Read More »तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत देसूर हायस्कूल संघ अजिंक्य!
बेळगाव : शिवाजी हायस्कूल कडोली येथे घेण्यात आलेल्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सी. एस. सी. टी. एस. देसूर हायस्कूल देसुर मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघात गोपाळकृष्ण पोटे, रोहन गुरव, रितेश मरगाळे, कपिल निटूरकर, सुशांत पाटील, करण गोरल, रामकृष्ण पाटील, विश्व लोहार, …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे स्वच्छता सेवा अभियान
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या वतीने स्वच्छता सेवा अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पंचायत अधिकारी श्रीमती नीलम्मा कमते, श्री. विजय असोदे व सुळगे ग्रामपंचायत सेक्रेटरी श्री. दुर्गाप्पा तहसीलदार उपस्थित होते. तर प्रमुख अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta