बेळगाव : मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेसाठी ज्योती कॉलेजच्या निवृत्त प्राध्यापिका सौ. ज्योती मधुकर मजुकर, श्रीमती कस्तुरी अशोकराव पवार, सौ नीलम शिवाजीराव नलावडे यांनी रोख रुपये 60000/- (साठ हजार रुपये) देणगी दिली आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील, खजिनदार एन. बी. खांडेकर, सदस्य पी. पी. बेळगावकर, नरसिंह पाटील, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते. सुरुवातीला मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजनेची माहिती दिली. विद्यार्थी दत्तक योजनेमध्ये आतापर्यंत माजी विद्यार्थी, हितचिंतक, उद्योजक, शिक्षक, प्राध्यापक आणि अनेक शिक्षण प्रेमी यांनी देणगी देऊन अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. प्रा. ज्योती मजूकर यांनी शाळेच्या या समाजोपयोगी उपक्रमामध्ये आर्थिक मदत करून हातभार लावताना आनंद होत असल्याचे मत व्यक्त केले आणि संस्थेचे खजिनदार एन. बी. खांडेकर यांच्याकडे देणगी रक्कम सुपूर्द केली.
एन. बी. खांडेकर सरांनी संस्थेच्या वतीने प्रा. ज्योती मजुकर यांचा सन्मान करून देणगी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक गजानन सावंत, शिक्षण संयोजक नीला आपटे, शिक्षक, पालक उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर यांनी आभार मानले.