बेळगाव : कुरुक्षेत्र हरियाणा येथे 28 ते 2 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघ गुरुवार तारीख 26 रोजी सायंकाळी गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसने रवाना झाले आहेत.
या संघाला शाळेचा माजी विद्यार्थी ओमकार देसाई यांनी फुटबॉल गणवेश देऊन संघाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांनीही संघाला शुभेच्छा दिल्या तसेच संघाला गणवेश दिल्याबद्दल ओमकार देसाई याचा सत्कार करून अभिनंदन केले. या संघासमवेत शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, चंद्रकांत तुर्केवाडी, शामल दड्डीकर, प्रेमा मेलीनमनी हे रवाना होत आहेत. या प्राथमिक 14 वर्षाखालील मुलींच्या संघात कर्णधार निधीशा दळवी, उपकर्णधार समीक्षा खन्नूरकर, श्रेया लाटुकर, हर्षदा जाधव, समृद्धी कोकाटे, धनश्री जमखंडीकर, राधा धबाले, कल्याणी हलगेकर, अनन्या रायबागकर, सिंचना तिगडी, हर्षिता गवळी, समृद्धी घोरपडे, सृष्टी सातेरी, आदिती सुरतेकर, अद्विता दळवी, कनिष्का हिरेमठ कृतिका हिरेमठ, तर माध्यमिक 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कर्णधार चैत्रा इमोजी, उपकर्णधार दीपा बिडी, अंजली चौगुले, ऐश्वर्या शहापूरमठ, चरण्या एम, भावना कौजलगी, सृष्टि बोंगाळे, किर्तीका लोहार, सृष्टी भोंगाळे, दीपिका रेंग, मोनिता रेंग, अमृता मलशोय, सान्वी पाटील, संस्कृती भंडारी, जिया बाचीकर या खेळाडूंचा संघात समावेश आहे.