बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव तर्फे बेळगाव परिसरातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे मराठी भाषा शिक्षण अर्थपूर्ण व आनंददायी व्हावे, त्यांचे लेखन-वाचन कौशल्य विकसित व्हावे, विचार अभिव्यक्तीला वाव मिळावा यासाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक व माध्यमिक गटात वेगवेगळ्या शाळांमध्ये पत्रलेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. यामध्ये जिजामाता हायस्कूल बेळगाव, शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी, बालिका आदर्श विद्यालय बेळगाव, महिला विद्यालय बेळगाव, न्यू इंग्लिश स्कूल मुतगे, बी के मॉडेल स्कूल बेळगाव, ठळकवाडी हायस्कूल टिळकवाडी, सरस्वती हायस्कूल हंदीगनूर, मराठी विद्यानिकेतन बेळगाव, भरतेश हायस्कूल, विज्ञान विकास मंदिर हायस्कूल इत्यादी शाळांमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वरील शाळांचे मुख्याध्यापक, मराठी शिक्षक व प्रबोधिनीचे पदाधिकारी इंद्रजीत मोरे, हर्षदा सुंठणकर, गौरी चौगुले, धीरजसिंह राजपूत, बी. बी. शिंदे, प्रसाद सावंत, गजानन सावंत, शिवराज चव्हाण यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन हर्षदा सुंठणकर यांनी केले. आभार प्रसाद सावंत यांनी मांडले.