बेळगाव : गाभण न जाताच २८ महिन्यांचे वासरु (पाडी) रोज दोन लिटर दूध देत आहे. हा आश्चर्यजनक प्रकार बेळगाव सीमा भागासह चंदगड तालुक्यात कुतूहल व चर्चेचा विषय ठरला आहे. बिजगर्णी (ता. जि. बेळगाव) येथील सदानंद मोरे यांच्या गाईची ही पाडी २८ महिन्यांची असून ती अद्याप एकदाही गाभण गेलेली नाही …
Read More »LOCAL NEWS
सुळेभावी गावातील “त्या” दुर्दैवी महिलांच्या कुटुंबीयांची डॉ. सोनाली सरनोबत यांनी घेतली भेट
बेळगाव : सुळेभावी गावातील दोन महिला विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडल्या. याची माहिती मिळताच कर्नाटक भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सुळेभावी गावातील कलावती मारुती बिदरवाडी आणि सविता फकिराप्पा वटी या दोन महिला गावातील मंदिराची साफसफाई करत असताना विजेचा …
Read More »फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट
बेळगाव : टिळकवाडी येथील एम आर भंडारी शाळा आयोजित श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर टिळकवाडी अनगोळ, शहापूर, विभागाच्या प्राथमिक मुलां- मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत अनगोळच्या संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला. पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने एम व्ही हेरवाडकर शाळेचा 1-0 असा पराभव केला तर दुसऱ्या उपांत्य …
Read More »सौ. व श्री. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानतर्फे अलतगा येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप
बेळगाव : सौ. व श्री. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठान आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्यावतीने अलतगा येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले. मराठी भाषा व मराठी संस्कृती टिकावी यासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून कोंडुस्कर कुटुंबीय हा स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. …
Read More »शहापूर पोलिसांकडून घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक
बेळगाव : बेळगाव शहरातील विविध पोलीस स्थानकात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात शहापूर पोलिसांनी एका अटक करून त्याच्या जवळील मुद्देमाल जप्त केला आहे. फरदीन नूर अहमद शेख रा. वझे गल्ली बोळ विष्णू गल्ली वडगाव असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळील शहापूर पोलीस स्थानक व्याप्तीतील तर हजार रुपये किमतीची सोन्याची …
Read More »जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि गणेशोत्सव महामंडळांची गणेशोत्सवासंदर्भात बैठक संपन्न
बेळगाव : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव हा सण येऊन ठेपला आहे. शहर आणि उपनगरात गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. याच भव्य दिव्य आणि सीमाभागात चर्चा असलेल्या गणेशोत्सवाच्या बैठकींना देखील सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात येऊ घातलेले गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या तयारीसाठी बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठकीचे …
Read More »गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे निवेदन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर
बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर विविध परवानगीसाठी सिंगल विंडो, रस्त्यांची दुरुस्ती, गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे, पाणपोईची व्यवस्था, मंडप परिसरातील स्वच्छता आदी विविध मागण्यांचे निवेदन आज मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 7 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. …
Read More »जीतो संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिर
बेळगाव : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) या संस्थेच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जितोतर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात संस्थेचे चेअरमन वीरधवल उपाध्ये आणि उपक्रमाचे अध्यक्ष …
Read More »बेळगाव शहर भक्तीसाठी प्रसिद्ध : परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज
बेळगाव : “तीस वर्षांपूर्वी वृंदावन प्रभुनी बेळगावात सुरू केलेल्या हरे कृष्णा आंदोलनाने आज भव्य असे स्वरूप प्राप्त केले आहे. बेळगाव शहर भक्तीसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळेच आजचा हा हजारोंचा जनसमुदाय श्रीकृष्ण भक्तीत न्हाउन निघाला आहे “असे विचार इस्कॉन चळवळीतील ज्येष्ठ संन्यासी परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले. येथील …
Read More »स्नेहम कारखान्याला आग; एकाचा मृतदेह सापडला
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावच्या हद्दीतील स्नेहम इंटरनॅशनल इन्सुलिन टेप निर्मिती कारखान्याला काल रात्री 8.45 च्या दरम्यान आग लागली. यामध्ये एकाचा मृतदेह सापडला असून तीन कामगार गंभीर भाजले असून त्यांना बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारुती करवेकर (32), यल्लाप्पा सालगुडे (35), रणजित पाटील (39) हे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta