Monday , September 21 2026
Breaking News

स्नेहम कारखान्याला आग; एकाचा मृतदेह सापडला

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नावगे गावच्या हद्दीतील स्नेहम इंटरनॅशनल इन्सुलिन टेप निर्मिती कारखान्याला काल रात्री 8.45 च्या दरम्यान आग लागली. यामध्ये एकाचा मृतदेह सापडला असून तीन कामगार गंभीर भाजले असून त्यांना बुधवारी सकाळी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मारुती करवेकर (32), यल्लाप्पा सालगुडे (35), रणजित पाटील (39) हे गंभीर जखमी झाले. अजूनही अनेक लोक अडकल्याची माहिती असून अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध मोहीम हाती घेतली आहे.
लिफ्टमध्ये एक मजूर अडकल्याच्या संशयावरून एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून लिफ्ट कट करण्याचे काम सुरू आहे.
यल्लप्पा (18) लिफ्टमध्ये अडकून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत असून, लिफ्टचे दरवाजे मेटल कटरने कापणारे कर्मचारी कालपासून 15 तास सतत कारवाई करत आहेत. काही क्षणातच मृतदेह लिफ्टमधून बाहेर काढण्यात येईल.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *