Monday , September 21 2026
Breaking News

सुळेभावी गावातील “त्या” दुर्दैवी महिलांच्या कुटुंबीयांची डॉ. सोनाली सरनोबत यांनी घेतली भेट

Spread the love

 

बेळगाव : सुळेभावी गावातील दोन महिला विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडल्या. याची माहिती मिळताच कर्नाटक भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सुळेभावी गावातील कलावती मारुती बिदरवाडी आणि सविता फकिराप्पा वटी या दोन महिला गावातील मंदिराची साफसफाई करत असताना विजेचा धक्का बसला व दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. मयत महिलांना प्रत्येकी चार मुले आहेत. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच कर्नाटक भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी मयत महिलांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाग्यश्री कोकितकर, स्नेहल कोळेकर, चेतना अगसेकर आदींसह स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *