Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

प्रज्वल रेवन्ना यांची आईच अत्याचार पीडितांचे अपहरण करायची; एसआयटीचा उच्च न्यायालयात खुलासा

  बंगळुरू : प्रज्वल रेवन्ना प्रकरणात कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने उच्च न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. आरोपी माजी जनता दल (धर्मनिरपेक्ष) खासदार प्रज्वल रेवन्ना यांची आई, भवानी रेवन्ना, लैंगिक छळातील पीडितांचे अपहरण करायची. पीडितांना पोलिसात गुन्हेगारी तक्रार दाखल करण्यापासून रोखण्यासाठी त्या त्यांच्या संपर्कात होत्या, अशा खुलासा कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीने केलाय. दरम्यान …

Read More »

नक्की आत्मचिंतन करायचं कुणी; समितीच्या अस्तित्वाचा प्रश्न…

  (२) लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास गळून पडलेला आहे. एरवी महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी सर्वस्वपणाला लावण्याची भाषा करणारे नेते मंडळी यांच्यासह आम्ही कायम समिती सोबत आहोत म्हणून सांगणारे कार्यकर्ते यांच्या कर्तृत्वाचा आलेखच जणू या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समोर आला आहे. पराभवाची कारणमिमांसा तर …

Read More »

भारत विकास परिषदेची प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगावात यशस्वीपणे उत्साहात संपन्न

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने कर्नाटक उत्तर प्रांतस्तरीय कार्यशाळा बेळगाव येथे आय.एम.ई.आर.च्या सभागृहात उत्साहात पार पडली. कार्यशाळेस कर्नाटक उत्तर प्रांतच्या सर्व शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी सकाळी १० पासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण चार सत्रांमध्ये कार्यशाळा झाली. प्रारंभी कर्नाटक उत्तर प्रांतचे प्रभारी पुरूषोत्तमदास इनाणी, प्राचार्य व्ही. एन. जोशी, प्रांत …

Read More »

“प्रेमासाठी वाट्टेल ते” आईमुळे तीन मुले वाऱ्यावर!

  बेळगाव : एका आईने आपल्या मुलांना सोडून २५ वर्षीय तरुणासोबत पळ काढल्याची धक्कादायक घटना बेळगावच्या गणेशपूरमध्ये उघडकीस आली आहे. आईमुळे सध्या तीन मुले रस्त्यावर आली असून सध्या त्या तीन मुलांनी कॅम्प पोलिस स्थानकात न्याय मागण्यासाठी धाव घेतली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पतीच्या निधनानंतर सहानुभूतीच्या आधारे पतीच्या …

Read More »

मनोरुग्णांची मानसिकता ओळखणे गरजेचे : डॉ. देवता गस्ती

  संजीवीनी फौंडेशनची मनोरुग्णांसाठी आयोजित “नयी दिशा” कार्यशाळा संपन्न बेळगाव : मनोरुग्णांची मानसिकता ओळखून त्यांच्या घरच्यांनी योग्य ते उपचार चालू ठेवल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, कुणीतरी काळी जादू केली आहे म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असल्याचे मत राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. …

Read More »

पोक्सो प्रकरण: येडियुरप्पा झाले सीआयडीसमोर सुनावणीला हजर

  बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा पोक्सो प्रकरणी चौकशीसाठी आज सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. या प्रकरणी येडियुरप्पा यांना अटक न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अटकेची भीती न बाळगता सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर राहून या प्रकरणाबाबत आपले म्हणणे नोंदवले. बंगळुरमधील पॅलेस रोड येथील सीआयडी मुख्यालयात …

Read More »

भाजपकडे आंदोलन करण्याची नैतिकता नाही

  मुख्यमंत्र्यांचा भाजपवर घणाघात; मोदींच्या काळात इंधन दरात मोठी वाढ बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्याची भाजपकडे नैतिकता नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचा पलटवार त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालय कृष्णा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पेट्रोल …

Read More »

भाजपच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात निदर्शने

  बेळगाव : राज्य सरकारने केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा निषेध करत बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी चक्क दुचाकीच्या दावणीला बैल बांधून निषेध नोंदविला. राणी कित्तूर चन्नम्मा येथे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे आमदार अभय पाटील व माजी आमदार महादेवप्पा यादवाड, अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी आदी नेत्यांनी दुचाकीला बैलाची जोड देत …

Read More »

गोवावेस येथील मनपाच्या महसूल विभागात चोरी

  बेळगाव : गोवावेस येथील मनपा इमारतीत असलेल्या महानगर निगम बेळगाव महसूल विभागामध्ये चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोवावेस तेथील महानगरपालिकेच्या इमारतीत वार्ड क्र १ ते २६ दक्षिण विभागाचा कारभार चालतो. सकाळी १०-३० वाजता. ऑफिस कर्मचाऱ्यारी प्रवेश केल्यानंतर महत्वाची कागदपत्रे विस्कटल्याचे आढळून आले. तसेच एक लॅपटॉप देखील चोरीस गेल्याचे …

Read More »

बेळगावात बकरी ईद सण उत्साहात; ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा

  बेळगाव : बलिदानाचे प्रतीक असलेला मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-उल-अधा किंवा बकरी ईद मोठ्या धार्मिकतेने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. बकरी ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज अदा ‘ईद-उल-अधा ‘ हा सण इस्लामिक कॅलेंडरच्या 12व्या महिन्यात म्हणजेच ए-जिल्हिज्जा महिन्यात साजरा केला जातो. मुस्लिम समाजातील लोकांसाठी हा सण खूप खास आहे. बलिदानाचे …

Read More »