Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बालबोधिनी अंकलिपी प्रकाशन सोहळा व शैक्षणिक उपक्रम शुभारंभ

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बालबोधिनी अंकलिपी प्रकाशन सोहळा व शैक्षणिक उपक्रम शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम गुरुवार दिनांक १३ जून २०२४ रोजी कावळे संकुल टिळकवाडी, येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस श्री. मालोजीराव अष्टेकर, रविकिरण प्रकाशनचे प्रशांत इनामदार, नगरसेवक शिवाजी …

Read More »

डिजिटल न्यूज असो. तर्फे खा. जगदीश शेट्टर यांचा सत्कार

  बेळगाव : बेळगावचे नूतन खा. जगदीश शेट्टर यांचा डिजिटल न्यूज असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. खा. शेट्टर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच यावेळी बोलताना बेळगावातील समस्यांच्या संदर्भात आपण अभ्यास करत आहोत. अनेक समस्या निवारणासाठी आपले प्रयत्न राहतील अशी ग्वाही दिली. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी रतन गवंडी, इकबाल जकाती, उपेंद्र बाजीकर, …

Read More »

बेळगावचे चार युवक बेळगाव ते लेह लडाख दुचाकीवरून रवाना

  बेळगाव : शहरातील युवक सुशांत संजय सांगूकर (गोंधळी गल्ली), मृणाल मधुकर काकतकर (हिंडलगा), कौशिक शिवाजी भातकांडे व प्रियेश किरण लोहार (दोघे भातकांडे गल्ली) हे चौघेजण बेळगाव ते लेह लडाख प्रवासासाठी दुचाकीवरून बुधवार दिं.12 रोजी सकाळी रवाना झाले. चार युवकांची ही तुकडी बेळगाव ते दिल्ली, दिल्ली ते लेह लडाख व …

Read More »

विश्वभारत सेवा समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  बेळगाव : विश्वभारत सेवा समिती बेळगावची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शारदा प्रमोद चिमडे या होत्या. तसेच संस्थेचे सचिव प्रकाश नंदीहळी, श्री. निगोंजी पार्लेकर आणि श्री. पूण्णाप्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सभा पार पाडली. या वार्षिक सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी यांनी केले. …

Read More »

माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना अटक होण्याची शक्यता

  बंगळुरू : पोक्सो प्रकरणी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सीआयडी पोलिसांनी पॉक्सो प्रकरणात चौकशीला उपस्थित राहण्याची नोटीस बजावूनही येडियुराप्पा चौकशीसाठी हजर होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडीने माजी मुख्यमंत्री बी. एस येडियुराप्पा यांच्या अटकेची तयारी केली आहे. अटक वॉरंटच्या …

Read More »

बालकामगारांना शिक्षण आणि संरक्षण पुरविणे आवश्यक : मुरली मोहन रेड्डी

  बेळगाव : घरातील गरिबी, जबाबदारी यासारख्या अनेक गोष्टींमुळे मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली असतात. अशा बालकांना सक्तीच्या शिक्षण कायद्याद्वारे संरक्षण व शिक्षण दिले पाहिजे, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव मुरली मोहन रेड्डी यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा वकील संघ बेळगाव …

Read More »

रामतीर्थनगर येथील विकासकामांची आम. सेठ यांच्याकडून पाहणी

  बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी नुकताच रामतीर्थनगरचा दौरा करून तेथील शिवालय परिसरातील सौंदर्यीकरण बांधकामाची पाहणी केली आणि मंदिराच्या बांधकामाचा दर्जा आणि भविष्यातील देखभालीबाबत रहिवाशांना आश्वस्त केले. याशिवाय बेळगाव शहर विकास प्राधिकरणामार्फत (बुडा) परिसरात सुरू असलेल्या प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली. रामतीर्थनगर येथील शिवालय परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या …

Read More »

पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देणाऱ्याला गोळ्या घाला : प्रमोद मुतालिक

  धारवाड : बेळगाव कोर्ट आवारात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या जयेश पुजारीला गोळ्या घालून ठार मारा अशी प्रतिक्रिया श्रीराम सेनाप्रमुख प्रमोद मुतालिक यांनी व्यक्त केली आहे. धारवाडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, चिक्कोडीत काँग्रेस उमेदवाराच्या विजयोत्सवात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. याबाबत काँग्रेसने विचार करणे गरजेचे आहे. याचपाठोपाठ आता बेळगावमध्ये …

Read More »

पाक समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या आरोपीला वकिलांकडून चोप

  बेळगाव : न्यायालयाच्या आवारात पाक समर्थनार्थ घोषणा देणाऱ्या आरोपीला वकिलांनीच मारहाण केल्याची घटना न्यायालय आवारात घडली. नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकारी अलोककुमार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खटला सुरू असलेला आरोपी जयेश पुजारी याने न्यायालयाच्या आवारात पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. यामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी चांगलेच चोपले. त्यानंतर एपीएमसी पोलिसांनी …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे शिक्षक बी. एम. पाटील यांनी साने गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाचे नियोजन उपक्रम प्रमुख शाहीन शेख यांनी केले होते. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली. हर्ष पावशे, आदिती शिंदे …

Read More »