Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

“काळा दिवस” साजरा झाल्यास बेळगावात रणांगण होईल : नारायण गौडाचे प्रक्षोभक वक्तव्य!

  बेळगाव : १ नोव्हेंबरला बेळगावमध्ये ‘काळा दिवस’ साजरा करण्याचा प्रयत्न झाल्यास गप्प बसू नका. तुम्ही तुरुंगात गेलात तरी चालेल, तुम्हाला सोडवून आणायला मी आहे. ‘काळ्या दिवसाचे’ समर्थन करणाऱ्यांना सोडू नका असे प्रक्षोभक वक्तव्य कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष टी. ए. नारायणगौडा यांनी केले आहे. आज बेळगावच्या गांधी भवनात कर्नाटक रक्षण …

Read More »

बाग परिवाराचा काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न!

  बेळगाव : बाग परिवाराचा ऑक्टोबर महिन्यातील काव्यवाचनाचा कार्यक्रम आज जत्तीमठ येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा सडेकर यांनी केले. काव्यवाचन कार्यक्रमात एकापेक्षा एक दर्जेदार अशा कविता सादर झाल्या. जेष्ठ कवी निळू भाऊ नार्वेकर (फक्त एक रात्र), स्नेहल बर्डे (कोरोना), अशोक सुतार (भावना अंधश्रद्धेच्या), जोतिबा नागवडेकर (इंग्रजी), प्रतिभा सडेकर (मुलगी …

Read More »

स्वामी विवेकानंद स्मारक येथे १६ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : स्वामी विवेकानंदानी भारत भ्रमण करताना १६ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावला भेट दिली होती. तीन दिवस स्वामींचे वास्तव्य रिसालदार गल्ली येथील भाते यांच्या निवासस्थानी होते. याचे औचित्य साधून रामकृष्ण मिशन आश्रमतर्फे रिसालदार गल्ली येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.   गुरुवार दि. १६ रोजी सायंकाळी …

Read More »

पहिले कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन २ नोव्हेंबर रोजी

  कोल्हापूर (प्रतिनिधी ) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने “पहिलं कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५” रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या आयोजनाचा निर्णय कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. …

Read More »

बेळगाव स्थानकात धाडसी कृत्य; आरपीएफ जवानाने चालत्या गाडीतून पडणाऱ्या प्रवाशाचे प्राण वाचवले!

  बेळगाव : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाच्या कार्यतत्परतेमुळे एका 55 वर्षीय प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. बेळगाव रेल्वे स्थानकात चालत्या गाडीतून पडणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ जवानाने प्राण वाचवले. त्याच्या या धैर्याचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. गाडी क्रमांक 16210 मैसूर अजमेर एक्सप्रेसमधून एका प्रवाशाचा स्लीपर कोच मधून उतरत असताना तोल जाऊन …

Read More »

डीसीसी बँक संचालक मंडळाच्या ६ जागांवर जारकीहोळी समर्थकांची बिनविरोध निवड

  बेळगाव : राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पुन्हा एकदा जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व दिसून आले आहे. 16 पैकी सहा जागांवर जारकीळी समर्थकांची बिनविरोध निवड झाल्याने केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सहकार क्षेत्रात देखील जारकीहोळी कुटुंब यांचे वर्चस्व सिद्ध होत आहे. बिनविरोध निवड झालेल्या संचालकांमध्ये चिकोडीतून गणेश हुक्केरी, यरगट्टी …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध

  बेळगांव : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एक सनातनी वकील राकेश किशोर तिवारी याने बूट उभारुन हल्ला करण्याचा निंद्य प्रयत्न केला. त्याचा प्रगतिशील लेखक संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. दोन्ही संस्थांच्या शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत एका ठरावाद्वारे हा निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी …

Read More »

संत मीरा शाळेच्या खेळाडूंची विद्याभारती राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या तीन अथलेटिक खेळाडूंची विद्याभारती राष्ट्रीय अथलेटिक स्पर्धेसाठी दक्षिण मध्य क्षेत्र संघात निवड झाली आहे. बंगळुर येथील जनसेवा विद्या केंद्र शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्य क्षेत्र आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय अथलेटिक स्पर्धेत बेळगांव जिल्हा विद्याभारती संघाचे प्रतिनिधीत्व करताना अनगोळ …

Read More »

10 वर्षीय बालिकेवर आधी बलात्कार नंतर 19 वेळा चाकू भोसकून खून!

  बेंगळुरू : म्हैसूरमध्ये दहा वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कार व हत्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून शिवविच्छेदन तपासणीत आरोपीने मुलीवर बलात्कार करून तब्बल 19 वेळा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. सदर आरोपीने झोपलेल्या मुलीला ओढत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिला चाकूने भोसकले व तिची अमानुषरित्या …

Read More »

महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या समस्या निवारण्यात काँग्रेस सरकार अपयशी : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : कर्नाटकात काँग्रेसच्या राज्यात महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या समस्येत अधिक भर पडली असून या समस्या निवारण्यात काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचा विश्वासघात करत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत तर दुसरीकडे शेतकरी अवकाळी पावसामुळे तर कधी मुसळधार पावसामुळे हातबल झाला …

Read More »