Sunday , April 5 2026
Breaking News

LOCAL NEWS

चोरी आणि दरोड्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी बेळगावमध्ये “लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम” सुरू

  बेळगाव : चोरी आणि दरोड्यांच्या वाढते प्रकारावर आळा घालण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी “लॉक्ड हाऊस बीट सिस्टीम” नावाची एक नवीन सुरक्षा व्यवस्था सुरू केली आहे. शहराबाहेर जाणारी कोणतीही व्यक्ती त्यांचा पत्ता, स्थान पिन आणि अनुपस्थितीचा कालावधी शहर पोलिस नियंत्रण कक्षाला दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे पाठवू शकतात. नियंत्रण कक्ष: माहिती व्हाट्सअपद्वारे ८२७७९५११४६ …

Read More »

संजीवीनी फाउंडेशनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

  बेळगाव : संजीवीनी फाउंडेशनच्या आदर्श नगर येथील काळजी केंद्रात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ओरिओनिस प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे सीईओ टी. आर. पालकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत म्हणत देशप्रेमाची भावना …

Read More »

“मेंढरांच्या पाठीमागे राहूनही स्वप्नांपर्यंत पोहोचता येते, फक्त जिद्द हवी!”

  बेळगाव : श्री. आर. एम. चौगुले व श्री मातोश्री सौहार्द सोसायटी, मण्णूर पुरस्कृत कै. श्री एम. डी. चौगुले व्याख्यानमालेचा समारोप समारंभ हिंडलगा येथे अत्यंत प्रेरणादायी, उत्साहपूर्ण आणि वैचारिक वातावरणात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. हा समारोप केवळ एका कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरला. ज्ञान, अनुभव, …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या शिक्षिका मुक्ता आलगोंडी उपस्थित होत्या. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला प्रमुख पाहुणे मुक्ता आलगोंडी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

  बेळगाव : पूर्वीपासूनच खो- खो हा खेळ येळ्ळूर गावची परंपरा आहे आणि ही परंपरा विद्यार्थ्यांनी सातत्याने सुरू ठेवावी. यशस्वी होण्यासाठी बौद्धिक व शारीरिक क्षमता ही तेवढीच महत्त्वाची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या सदृढ राहणे तेवढेच महत्त्वाचे आहे, असे गौरव उद्गार संस्थापक श्री. वाय. एन. मजुकर यांनी क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन …

Read More »

“बेळगाव वार्ता”च्या रायगड जिल्हा प्रतिनिधींनी केले “मराठी सन्मान यात्रे”चे स्वागत

  महाड (रायगड) : रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पत्रकार नरेश पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमभागचे अध्यक्ष शुभम शेलके यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. पत्रकार नरेश पाटील हे “बेळगाव वार्ता”चे महाराष्ट्रातील रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. मूळचे बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील …

Read More »

भजन, हलगी आणि मराठी गर्जना; रायगडच्या पायथ्याशी “मराठी सन्मान यात्रे”चा जागर

  रायगड (नरेश पाटील) : बेळगाव सीमाभागातून “मराठी सन्मान यात्रे”च्या निमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली युवा समिती सीमाभागचे पदाधिकारी व सुमारे २५० हून अधिक स्वाभिमानी कार्यकर्ते रविवारी सायंकाळी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड (ता. महाड) येथील धर्मशाळेत दाखल झाले. सीमा भागातील विविध ठिकाणांहून हे …

Read More »

विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या ‘वृंदावन सिटी प्राइड’ प्रकल्पाचे उद्या वाघवडे येथे भव्य अनावरण

  बेळगाव : शहराच्या धाकधुकीच्या जीवनापासून लांब निसर्गरम्य व शांत परिसरात विकास बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्यावतीने “वृंदावन सिटी प्राईड” हा आत्याधुनिक निवासी प्लॉट प्रकल्प वाघवडे रोड, रंगोली बस स्टॉप समोर, वाघवडे येथे साकारण्यात येत असून या प्रकल्पाला केजीपी मंजूर एन.ए. लेआउट मंजूर झाले आहे. हा प्रकल्प खानापूर -बेळगाव महामार्गापासून वाघवडे …

Read More »

मराठी सन्मान यात्रे पार्श्वभूमीवर महाडच्या चवदार तळ्याला अभिवादन!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग बेळगाव यांच्या वतीने किल्ले रायगड येथे संघटनेच्या वतीने 200 ते 225 कार्यकर्ते दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन बेळगावसह सीमाभागात मराठी अस्मितेची जागृती व सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करणार आहेत, किल्ले रायगड येथे जाण्यापूर्वी …

Read More »

मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

  कैवल्ययोग आश्रम- कुसमळी, जांबोटी रोड येथे मिरज माहेर मंडळाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमानिमित्त वार्षिक सहल व संक्रांतीचे हळदीकुंकू असे आयोजन करण्यात आले होते. विजापूरचे डाॅक्टर प्रशांत कटकोळ यांनी या निसर्गरम्य परिसरात या आश्रमाची उभारणी केली. ध्यान धारणा व योगसाधना सुलभतेने व्हावी या हेतूने ‘प्रशांत कुटीर’ची निर्मिती …

Read More »