Monday , April 20 2026
Breaking News

जनगणतीसंदर्भात मराठा समाजातील नागरिकांनी कार्यतत्पर रहावे : मराठा समाजाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : मराठा कुणबी समाजातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कर्नाटक सरकारने सुरू केलेल्या सामाजिक व शैक्षणिक जनगणतेसाठी (सर्वे) ज्या नागरिकांची जनगणती केली नाही, अशा नागरिकांनी आपले रेशन कार्ड व विद्युत मीटर क्रमांक तसेच आपल्या दरवाजावर लावलेला यूएचआयडी क्रमांक घेऊन आपण गणतीसाठी जे सरकारी अधिकारी येत आहेत त्यांच्याकडे याबाबत विचारणा करावी, तसेच आपण जागरूक राहून सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्याकडे यासंदर्भात आपण आपल्या समस्येचे लक्ष वेधावे जेणेकरून ते पुढील अधिकाऱ्यापर्यंत आपली तक्रार पोचवतील व आपले सर्वे करण्यासाठी गतिमानता येईल.

मराठा समाजातील सर्व नागरिकांनी पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, या जनगणतीमध्ये आपण आपला धर्म हिंदू (कॉलम 8 मध्ये कोड क्रमांक 1), जात मराठासाठी (कॉलम 9 मध्ये कोड क्रमांक A-0940) व उपजात कुणबीसाठी (कॉलम 10 मध्ये कोड क्रमांक A-0790) तसेच मातृभाषा मराठीसाठी (कॉलम 15 मध्ये कोड क्रमांक 6) असे नमूद करावे. विशेष करून आपली उपजात कुणबी (कॉलम 10 मध्ये कोड क्रमांक A- 0790) ही काळजीपूर्वक नोंद करावे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, नगरसेवकांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, ज्या नागरिकांची जनगणती केलेली नाही अशा नागरिकांची यादी बनवून ती संबंधित अधिकाऱ्याकडे देऊन त्या नागरिकांचे जनगणती करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तरी कृपा करून नागरिकांनी याची नोंद घेऊन दक्ष रहावे, व आपली जनगणती (सर्वे) करून घ्यावी. जनगणतीचे (सर्वे) हे काम 10 ऑक्टोबर पर्यंत आहे. तरी आपण लवकरात लवकर यासाठी कार्यतत्पर रहावे, असे आवाहन सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचे संयोजक प्रकाश मरगाळे यांच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *