

बेळगाव : सध्या कर्नाटक जिल्ह्यात जनगणना सुरू आहे ही जनगणना सुरू झाल्यापासून प्रशासनाचा गलथान कारभार समोर येत आहे. प्रशासनाने पहिल्यांदाच जनगणना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे राबविण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तांत्रिक त्रुटीमुळे ही जनगणना करताना संबंधित अधिकाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात जनगणना सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण न मिळाल्यामुळे सर्वेक्षण करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कधीकधी नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. वडगाव भागात सर्वेक्षणासाठी आले असता एका कुटुंबीयांचे वय १२५ असे दाखवण्यात आले त्यामुळे त्या कुटुंबात एकच गोंधळ उडाला व सर्वेक्षण करण्यास अधिकाऱ्यांना देखील अडथळे आले. तर मजगाव भागात सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणासाठी गेले असता माहिती संकलित करीत असताना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांसाठी पुरावे मागितल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कर्नाटक राज्यात सकल मराठा समाजाने धर्म- हिंदू, पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी असे नमूद करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र मजगाव येथील एका कुटुंबाचे सर्वेक्षण करत असताना सर्वेक्षणासाठी आलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कुटुंबीयांकडे जात प्रमाणपत्राचा पुरावा मागितला व शेती असल्याचा देखील पुरावा मागितला त्यामुळे नागरिक संभ्रमात पडले असून सर्वेक्षणाची माहिती देताना त्यांचा एकच गोंधळ उडत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta