बेळगाव : नवरात्रीनिमित्त सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. त्यामुळे परिसर गर्दीने फुलून जात असून, दर्शनासाठी दोन ते तीन तास भाविकांना रांगेत थांबावे लागत आहे. प्रत्येक दिवशी एक लाख भाविक देवी दर्शनासाठी श्री यल्लमा देवी डोंगरावर येत आहेत आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशीही आज गुरुवारी …
Read More »LOCAL NEWS
सरकारी नोकरीत खेळाडूंना दोन टक्के आरक्षण; आशियाई स्पर्धेत राज्यातील विजेत्या खेळाडूंचा गौरव
बंगळूर : सध्या पोलीस आणि वन विभागात खेळाडूंना ३ टक्के आरक्षण दिले जात आहे, मात्र इतर विभागांमध्येही २ टक्के आरक्षण देण्याबाबत अभ्यास करून कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. गृह कचेरी कृष्णा येथे नुकत्याच चीनमध्ये झालेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविलेल्या राज्यातील खेळाडू व प्रशिक्षकांचा …
Read More »दसरा पूजेत रासायनिक रंग, हळद, कुंकूच्या वापरावर बंदी
बंगळूर : दसऱ्याच्या आयुध पूजेदरम्यान फोडलेल्या भोपळ्या आणि रांगोळ्यांमध्ये कोणतेही रासायनिक रंग, हळद, कुंकुम आणि चुना वापरता येणार नाही, असा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. दसऱ्याच्या उत्सवातील आयुध पूजा ही अत्यंत महत्त्वाची पूजा आहे. भोपळा फोडून त्यात हळद, कुंकू, चुना आणि इतर रंग टाकण्याची आपली परंपरा आहे. रांगोळी …
Read More »परवानगी नसली तरी काळादिन गांभीर्याने पाळण्यात येणार
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : कर्नाटक प्रशासनाने काळ्या दिनाला परवानगी नाकारली असली तरीही काळादिन गांभीर्याने पाळणार आणि सायकल फेरी यशस्वी करणारच असा निर्णय शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. काळ्यादिनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी शहर समिती कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिरमध्ये झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर …
Read More »विजयपूर -बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात चार युवक जागीच ठार
विजयपूर : विजयपूर शहराजवळील विजयपूर- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री 11चा सुमारास एका भरधाव ट्रकने रस्ताबाजूस थांबले असलेल्या चार युवकांना धडक दिल्याने ते चार ही युवक जागीच ठार झाले असल्याची घटना घडली आहे. शहरापासून 10 कि.मी. अंतरावर एका टोलनाक्याजवळ हा अपघात झाला असून, प्रवीण संगनगौडा पाटील ( वय 31), …
Read More »‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ फलक सुनावणीतील 26 जण निर्दोष
बेळगाव : येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकाच्या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू असून 153 अ दोषारोप पत्राची मूळ प्रत न्यायालयासमोर हजर न केल्यामुळे तसेच पोलीस अधिकारी नारायण बरमनी साक्षीसाठी सातत्याने गैरहजर असल्याने 167/15 खटल्यातून एकूण 26 जणांची बेळगावच्या द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोन्नूर यांनी निर्दोष मुक्तता केली …
Read More »आयपी संचांसाठी सोलर पॅनल देण्याचा निर्णय; मंत्री जॉर्ज
खासगी उत्पादकांकडून १,१०० मेगावॅट वीजपुरवठा बंगळूर : ऊर्जा कंपन्या तात्काळ विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील तीन दिवसांत खासगी वीज उत्पादकांकडून १,१०० मेगावॅट अतिरिक्त वीज खरेदी करतील. राज्य सरकारने वीज कायदा कलम ११ अंतर्गत खासगी वीज उत्पादकांकडून वीज खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, आयपी संचांसाठी सोलर पॅनल देण्याचा निर्णय …
Read More »मनरेगांतर्गत बाकी रक्कम ४७८ कोटी मंजूर करा
मुख्य सचिव वंदिता शर्मा यांचे केंद्राला पत्र बंगळूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत राज्याची बाकी असलेली ४७८.४६ कोटी रुपये देण्याचे मुख्य सचिव वंदिता शर्मा यांनी केंद्रीय ग्रामीण विकास विभागाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. राज्यातील २३६ तालुक्यांपैकी १९५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. त्यापैकी १६१ तालुक्यांमध्ये तीव्र …
Read More »चक्क ट्रान्सफॉर्मरमधून मद्य वाहतूक; एकाला अटक
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदा मद्य वाहतूक करणारा (एम. एच. ४३ वाय – २९७६) क्रमांकाचा ट्रक हिरेबागेवाडी टोलनाक्यावर थांबवून तपासणी केली असता. ट्रकमध्ये बनावट ट्रान्सफॉर्मर ठेवून त्यामधून मद्यसाठ्याची वाहतूक करण्याऱ्या प्रकाराचा पर्दाफाश झाला. यावेळी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन, बेकायदा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक करण्यात आला. …
Read More »बेळगाव- पंढरपूर रेल्वेसाठी वारकरी मंडळाचे प्रशासनाला साकडे
बेळगाव : बेळगाव- पंढरपूर रेल्वे सुरू करा, अशा मागणीचे निवेदन बेळगावच्या वारकरी मंडळातर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळगाव जिल्ह्यातून पंढरपूरला मोठ्या संख्येने भाविक वर्षभर प्रवास करत असतात. बेळगावहून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास सोयीचा ठरतो. यापुर्वी बेळगावहून सुरू असलेल्या बेळगाव-पंढरपूर रेल्वे सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. बेळगाव-पंढरपूर रेल्वे, बेळगावहून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta