Sunday , July 26 2026
Breaking News

सौंदत्ती श्री रेणुका देवी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

Spread the love

 

बेळगाव : नवरात्रीनिमित्त सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. त्यामुळे परिसर गर्दीने फुलून जात असून, दर्शनासाठी दोन ते तीन तास भाविकांना रांगेत थांबावे लागत आहे. प्रत्येक दिवशी एक लाख भाविक देवी दर्शनासाठी श्री यल्लमा देवी डोंगरावर येत आहेत आज नवरात्रीच्या पाचव्या दिवशीही आज गुरुवारी यल्लमा डोंगर भाविकांनी फुलून गेला होता.

नवरात्रीमध्ये दर्शनासह तेल वाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच केरळ येथून भाविक दरवर्षी सौंदत्ती डोंगरावर मोठी गर्दी करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून देवीची पूजा करून दररोज आकर्षक आरास केली जात असून, पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी डोंगरावर दाखल होत आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष दर्शनाची सोयही करण्यात आली आहे.

मात्र, विशेष दर्शनासाठी रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे अनेक भाविक मोफत दर्शनाचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या रांगेतून दर्शनासाठी अधिक वेळ लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शनासाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे दर्शन लवकर होत असून, दररोज लाखो भाविक दर्शन घेत असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली. दर्शनासह वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याची खरेदी होत असल्याने दररोज कोट्यवधीची उलाढाल होत आहे. विजयादशमीपर्यंत दररोज गर्दी होणार असल्याने पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

महिलांना मोफत बस प्रवास
महिलांना मोफत बसप्रवास करण्याची संधी असल्याने महिला वर्ग बसने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे परिवहन मंडळाच्या सौंदत्ती डोंगराकडे जाणाऱ्या बसला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मंदिर व्यवस्थापनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *