कंत्राटदार संघटनेची तक्रार; मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र बंगळूर : सत्ताधारी काँग्रेसच्या काळात अनेक विभागांमध्ये भ्रष्टाचार मागील भाजप राजवटीच्या तुलनेत “दुप्पट” झाला असल्याची लेखी तक्रार कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेने (केएससीए) केली आहे, हा एक खळबळजनक आरोप आहे, जो मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारसाठी धक्का ठरू शकतो. कंत्राटदार संघटनेने २५ सप्टेंबर रोजी सिद्धरामय्या …
Read More »LOCAL NEWS
हिंदवाडी महिला मंडळाच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात
बेळगाव : हिंदवाडी महिला मंडळातर्फे हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. सोमवार दि. 22 सप्टेंबरपासून सुरू झालेला नवरात्रोत्सव गुरुवार दि. 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानिमित्त दररोज सकाळी आठ वाजता अभिषेक, पूजा, आरती कुमारीका पूजन असे धार्मिक कार्यक्रम नित्यनेमाने होत आहेत. तसेच दररोज सायंकाळी पाच वाजता …
Read More »बेळगाव जिल्ह्यात संततधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतीत मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पाण्यामुळे शेती पूर्णपणे जलमय झाली असून, पिके वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सौंदत्ती तालुक्यातील एका शेतकऱ्याची ८ एकर जमीन पूर्णपणे पाण्याखाली गेली असून, शासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने त्यांनी तीव्र असंतोष …
Read More »पोलिसाचा प्रामाणिकपणा; रस्त्यात पडलेली रक्कम परत!
बेळगाव : शुक्रवारी रात्री बेळगाव शहरात मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणाच्या खिशातून तब्बल दीड लाख रुपये रस्त्यात पडले होते. ती रक्कम बेळगाव उत्तर रहदारी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाय. वाय. तळेवाड यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ती रक्कम परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, वाय. वाय. तळेवाड …
Read More »तांत्रिक अडचणीमुळे सर्वेक्षणामध्ये अडथळे; एका घरात किमान एक तास
बेळगाव : राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे त्याचप्रमाणे जातीनिहाय जनगणना करण्यासाठी मोबाईल ॲप देखील सरकारने उपलब्ध केले आहे. परंतु सदर मोबाईल ॲपमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे सर्वेक्षणाच्या कामात अडथळा येत आहे. या सर्वेक्षणामध्ये एकंदर 60 प्रश्नांची …
Read More »श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि, उचगाव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि, उचगाव या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शंकर – पार्वती मंगल कार्यालयात सोसायटीचे संस्थापक- चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. श्री मळेकरणी देवीच्या फोटोचे पूजन संचालक श्री. मारूती सावंत यांनी केले. दीपप्रज्वलन संचालक श्री. सुरेश राजूकर, चंद्रकांत …
Read More »मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
बेळगाव : मलप्रभा धरणाच्या वरच्या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने, धरणाची पातळी २०७९.५० फूट आणि पूर्ण भरली आहे. मलप्रभा धरणात सध्या १५०० क्युसेकची आवक आहे. धरणाची पातळी योग्य राखण्यासाठी आज शनिवार दि. २७.०९.२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून मलप्रभा नदीला पाणी ३०० क्युसेकवरून १५०० क्युसेकपर्यंत वाढवून खबरदारीचा उपाय म्हणून हळूहळू …
Read More »जातीय जनगणना: सर्वेक्षण अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
जिल्हाधिकारी, जि. प. मुख्यसचिवांशी साधला संवाद बंगळूर : सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणा (जातीय जनगणना) वर परिणाम करणाऱ्या तांत्रिक समस्या जवळजवळ पूर्णपणे सोडवल्या गेल्या आहेत. आता सर्वेक्षण पूर्ण क्षमतेने पुढे जाईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सांगितले. त्यांनी असे प्रतिपादन केले की सर्वेक्षण निर्धारित कालावधीत पूर्ण केले जाईल आणि त्यासाठी …
Read More »न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्याची मागणी
बेळगाव : जिल्हा न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ऍड. शामसुंदर पत्तार आणि ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी बार असोसिएशन बेळगाव यांच्याकडे केली आहे. जिल्हा न्यायालय आवारात वकील, आरोपी, पोलीस, साक्षीदार, अशिलांचा वावर असतो. नेहमीच हा परिसर गजबजलेला असतो. न्यायालय आवारात एखाद्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या घटना …
Read More »श्री मलप्रभा साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस दारू विक्रीवर बंदी
बेळगाव : श्री मलप्रभा सहकारी साखर कारखाना नियमित एम. के. हुबळीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवार दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी, होस काद्रोळी आणि खानापूर तालुक्यातील इटगी गावाच्या व्याप्तीतील दारू दुकाने व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta