Monday , September 21 2026
Breaking News

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि, उचगाव सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Spread the love

 

बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि, उचगाव या सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा शंकर – पार्वती मंगल कार्यालयात सोसायटीचे संस्थापक- चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. श्री मळेकरणी देवीच्या फोटोचे पूजन संचालक श्री. मारूती सावंत यांनी केले. दीपप्रज्वलन संचालक श्री. सुरेश राजूकर, चंद्रकांत देसाई, लुम्माण्णा पावशे, सुरेश बेनके, कविता जाधव, प्रविणा देसाई, निळकंठ कुरबुर यांनी केले.

प्रास्ताविक, स्वागत, अहवाल वाचन, विषय मंजुरी संचालक श्री. बाळकृष्ण रामचंद्र देसाई यांनी केले. अहवाल सालात रु. 15,01,31,485-80 इतकी वार्षिक उलाढाल झाली आहे. खेळते भांडवल रु. 7,83,88,225-11 इतके आहे. नफा रु. 9,05,431-80 इतका उल्लेखनीय झाला आहे. तसेच सभासदांना 10℅ लाभांश जाहीर करून त्याचे वितरण करण्यात आले आहे व सभासदांनी आपला लाभांश (डिव्हिडंड) वेळेत घेऊन जावे असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सभेत सभासदांच्या गुणी विध्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला. सभेला मोठ्या संख्येने सभासद हजर होते. सुत्रसंचालन श्री. बाळकृष्ण देसाई यांनी केले व आभार सेक्रेटरी श्री. के. एन्. कदम यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *