बेळगाव : शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रिंगरोडसाठी अधिसूचना काढली असून याविरोधात आता उच्च न्यायालयात लढा देण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला. कॉलेज रोडवरील तालुका म. ए. समितीच्या कार्यालयात शनिवारी शेतकऱ्यांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी ऍड. राजाभाऊ पाटील होते. रिंगरोडविरोधात शेतकरी वर्षभरापासून तीव्र लढा देत …
Read More »LOCAL NEWS
जैन मुनी हत्या; सीआयडी पथकाची हिरेकोडी आश्रमला भेट
बेळगाव : हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार यांच्या खून प्रकरणासंदर्भात सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि विशेष विभाग डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज हिरेकोडीसह विविध ठिकाणी भेटी दिल्या. डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांनी सीआयडी आयजीपी प्रवीण पवार, आयजीपी एनआर विकासकुमार विकास यांच्यासह सीआयडीच्या संपूर्ण तपास …
Read More »अग्निवीरांची पहिली तुकडी देशसेवेसाठी सज्ज!
बेळगाव : कठोर लष्करी प्रशिक्षणाचा उपयोग करून मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव सज्ज रहा, सेवाकाळानंतरही एक चांगले नागरिक बनून देशसेवा करा, असे आवाहन ज्युनियर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुराया, व्हीएसएम यांनी केले. बेळगावातील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये इन्फन्ट्रीच्या यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्या अग्निवीर तुकडीचा शानदार शपथविधी समारंभ …
Read More »बेळगावातील विविध संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु या महापुरुषांविषयी अत्यंत हीन पातळीवरून संतापजनक वक्तव्ये केली आहेत. भारताला मिळालेले स्वातंत्र्यही ते मानत नाहीत. १५ ऑगस्ट रोजी काळा दिवस पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांची ही वक्तव्ये देशविरोधी व …
Read More »दुसरे रेल्वे गेट बंद; वाहन चालकांची गैरसोय
बेळगाव : रेल्वे खात्याकडून कोणतीही पूर्वसूचना न देता दुरुस्तीच्या कामासाठी टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे वाहन चालक आणि या भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणी सध्या रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदर गेट वाहतुकीसाठी बंद …
Read More »बेळगावातील दहा लाखांहून अधिक ग्राहकांना गृहज्योतीचा लाभ : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : गृहज्योती योजनेसाठी सरकार दरवर्षी बेळगाव जिल्ह्याला 516 कोटी रुपये देणार आहे. हमी योजनेतून दरमहा प्रति कुटुंब ४ ते ५ हजार रुपये खर्च केले जातील. त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी केला पाहिजे. तेव्हाच शासनाच्या हमीभाव योजना प्रभावी होतील, असे मत सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा प्रभारी …
Read More »वैश्यवाणी युवा संघटननेतर्फे 15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
बेळगाव : वैश्यवाणी युवा संघटना, बेळगाव यांच्यातर्फे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सन 2018 मध्ये युवा संघटनेतर्फे खास बेळगावकरांसाठी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. बेळगावातील रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास न भूतो न भविष्यती असा उदंड प्रतिसाद देऊन. वैश्यवाणी युवा संघटनेच्या पुढील वाटचालीस बळ दिले होते. त्यानंतर च्या काळात …
Read More »यमकनमर्डी पोलिस ठाण्यात बस नेऊन विद्यार्थ्यांनी छेडले आंदोलन
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी पोलीस ठाण्यात बीरहोली गावातील विद्यार्थ्यांनी बस आणून आंदोलन केले. संकेश्वर, यमकनमर्डी आणि आसपासच्या शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दररोज बीरहोळी गावातील शेकडो विद्यार्थी येतात. मात्र एक बस सकाळी 9 वाजता येत असल्याने शेकडो विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करता येत नसल्याने त्यांनी संकेश्वर, हत्तरगी परिवहन …
Read More »विविध मागण्यांसाठी अभाविपची बेळगावात निदर्शने
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बेळगावात निदर्शने करण्यात आली. सरकारने विद्यापीठांना पुरेसे अनुदान द्यावे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, कॉलेज विद्यार्थ्यांना सुसज्ज हॉस्टेल्स आणि तेथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावीत, बस पासचे समर्पक वितरण करावे आदी मागण्यांसाठी अभाविपच्या वतीने बेळगावातील टिळकवाडीतील आरपीडी क्रॉस येथे …
Read More »शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व मुलांना दप्तरांचे वाटप
बेळगाव : येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे मंगळवार (ता.1) रोजी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर जन्मदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. दीपक किल्लेकर होते. यावेळी विजयनगर येथील बेळगावकर हार्डवेअरचे मालक श्री. बेळगांवकर यांच्याकडून इयत्ता पहिलीच्या सर्व विदयार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. तसेच सरकार मार्फत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta