बेळगाव : पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याकडेने खोदण्यात आलेल्या मोठ्या चरित कोसळून अडकून पडलेल्या दोन गाईंपैकी एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म जवळ आज सकाळी घडली. गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म समोरील रस्त्याच्या कडेने मोठी पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल मोठी चर खोदून ठेवण्यात …
Read More »LOCAL NEWS
सुनेचा छळ केल्याच्या आरोपातून सासूची निर्दोष मुक्तता
बेळगाव : सुनेला शारिरीक व मानसिक त्रास करून माहेरीहून पैसे घेऊन ये म्हणून तगादा लावत मारहाण करुन घरातून हाकलल्याच्या प्रकरणातून साक्षीदारातील विसंगतीमुळे आरोपी सासूची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतची माहिती अशी की, किणये (ता. जि. बेळगांव) येथील दोन अपत्ये असलेल्या अनुराधा अमोल डुकरे (वय …
Read More »प्रख्यात गायक पंडित कैवल्य कुमार यांच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध!
बेळगाव : के एल एस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या भक्तीसुगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राग आणि विविध भजने सादर करून कैवल्य कुमार यांनी आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित कैवल्यकुमार यांनी आपल्या मैफिलीची सुरुवात रूपक तालातील गौड मल्हार रागाने …
Read More »मित्रांनीच केला मित्राचा खून!
बेळगाव : हुंचेनहट्टी येथे काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेली अरबाज रफिक मुल्ला या युवकाच्या खुनाची घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याचे स्पष्ट झाले असून मित्रांनीच अरबाजला पार्टीसाठी नेऊन त्याचा खात्मा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. प्रसाद नागेश वडर (रा. जन्नतनगर, पिरनवाडी) आणि प्रशांत रमेश कर्लेकर (रा. सिद्धेश्वर गल्ली, …
Read More »१३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदारला कांस्य
बेळगाव : मालदिव येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदार या व्यायामपटुने कांस्यपदक मिळवून भारताचा तिरंगा फडकविला. दि. ५ ते ९ जुलैपर्यंत झालेल्या या स्पर्धेत ६५ किलो वजन गटात व्यंकटेशने तिसरा क्रमांक मिळविला. बेळगावच्याच प्रविण कणबरकरने ७० किलो गटात चौथा क्रमांक पटकावला. प्रशिक्षक प्रसाद बसरीकट्टी …
Read More »हुंचेनट्टीनजीक आढळला तरुणाचा मृतदेह
बेळगाव : बेळगाव शहरातील हुंचेनट्टी अभियांत्रिकी महाविद्यालयानजीक आज शुक्रवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान मृतदेहाची ओळख पटली असून अरबाज मुल्ला (वय २५, रा. मच्छे , ता. बेळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, गुरुवारी रात्री अभियांत्रिकी …
Read More »इंदिरा कॅंटीनमध्ये उपलब्ध होणार भाजी-भाकरी
बेळगाव : गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या इंदिरा कँटीनला राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यापासून अच्छे दिन आले आहेत. कष्टकरी, गरिबांना दिलासा देणाऱ्या या कँटीनमध्ये गेल्या दीड- दोन महिन्यापासून लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद दिसून येत असून आता या कँटीनमध्ये भाजी-भाकरी देखील उपलब्ध होणार आहे. इंदिरा कँटीनमध्ये दैनंदिन लाभ घेणाऱ्यांची संख्यादेखील वाढू …
Read More »न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेचे विभागीय क्रिडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश
बेळगाव : बेळगाव मधील प्राथमिक व हायस्कूल पातळीवर विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध शाळांचे विभाग पाडण्यात आले असुन बेळगाव ग्रामीण मधील हलगा झोनच्या न्यू इंग्लिश स्कूल, मुतगे शाळेच्या दोन्ही मुला-मुलींच्या थ्रोबॉल संघाने प्रथम व कुस्तीमध्ये आर्यन चौगुले, ऋतिक पाटील, रोशन पाटील, प्रज्योत इंगळे आणि ऋतुजा …
Read More »असहाय्य वृद्ध दांपत्याला एफएफसीने दिला दिलासा
बेळगाव : फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या पुढाकाराने जांबोटी रस्त्यावरील बामणवाडी क्रॉस येथे हलाखीचे जीवन कंठणाऱ्या एका असहाय्य वृद्ध दांपत्याला जीवनावश्यक साहित्याची मदत करून दिलासा देण्यात आला. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, जांबोटी रस्त्यावरील बामणवाडी क्रॉस येथे एक वृद्ध जोडपं कोणाच्याही आधाराशिवाय एका छोट्या खोलीत हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती सागर …
Read More »सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा!
बेळगाव : राज्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लम्मा मंदिराची हुंडी मोजणी पूर्ण झाली असून यावेळी मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली आहे. 17 मे ते 30 जून या 45 दिवसांत मंदिरात 1.37 कोटी रुपयांची देणगी जमा झाली. मंदिराच्या हुंडीत 1 कोटी 30 लाख 42 हजार रुपये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta