Sunday , July 26 2026
Breaking News

सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या हुंडीत कोट्यवधी रुपयांची देणगी जमा!

Spread the love

 

बेळगाव : राज्यातील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रेणुका यल्लम्मा मंदिराची हुंडी मोजणी पूर्ण झाली असून यावेळी मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली आहे.
17 मे ते 30 जून या 45 दिवसांत मंदिरात 1.37 कोटी रुपयांची देणगी जमा झाली. मंदिराच्या हुंडीत 1 कोटी 30 लाख 42 हजार रुपये रोख, 4.44 लाख किमतीचे सोने, 2.29 लाख किमतीचे चांदीचे दागिने जमा झाले आहेत.
राज्य सरकारने शक्ती योजनेंतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवास सुरू केल्यानंतर राज्यातील विविध तीर्थक्षेत्रे व मंदिरांमध्ये भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, मंदिरांमधील देणगी जमा होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *