Monday , September 21 2026
Breaking News

पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरित अडकून गाईचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याकडेने खोदण्यात आलेल्या मोठ्या चरित कोसळून अडकून पडलेल्या दोन गाईंपैकी एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म जवळ आज सकाळी घडली.

गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म समोरील रस्त्याच्या कडेने मोठी पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल मोठी चर खोदून ठेवण्यात आले असून काम पूर्ण झाले नसल्यामुळे चर बुजवण्यात आलेली नाही. त्यामुळे या धोकादायक खोदलेल्या चरीमध्ये दोन गाई कोसळून अडकून पडल्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच संतोष दरेकर, नरेश निलजकर, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, वरूण कारखानीस, आतिश धटोंबे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले. या कार्यकर्त्यांनी चरीत खोल खाली कोसळलेल्या गाईंना दोरीला पट्टा बांधून जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढले.
याप्रसंगी पोलिसांसह लष्करी जवान उपस्थित होते. चरीतून बाहेर काढलेल्या दोन गाईंपैकी एका गाईला गंभीर दुखापत होवून बराच काळ अडकून पडल्यामुळे एका गाईचा मृत्यू झाला होता. त्या मृत गाईवर रस्त्याशेजारीच मोकळ्या जागेत खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्यात आले. गाईचे अंतिम विधी रहदारी पोलीस श्रीधर कुटोळी यांनी केले. गाईंच्या बाबतीत घडलेल्या दुर्घटनेमुळे रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *