Monday , September 21 2026
Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल मुतगे शाळेचे विभागीय क्रिडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव मधील प्राथमिक व हायस्कूल पातळीवर विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध शाळांचे विभाग पाडण्यात आले असुन बेळगाव ग्रामीण मधील हलगा झोनच्या न्यू इंग्लिश स्कूल, मुतगे शाळेच्या दोन्ही मुला-मुलींच्या थ्रोबॉल संघाने प्रथम व कुस्तीमध्ये आर्यन चौगुले, ऋतिक पाटील, रोशन पाटील, प्रज्योत इंगळे आणि ऋतुजा गुरव यांनी प्रथम क्रमांक पटकविला. त्यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने कौतुक करण्यात आले असुन, पुढील तालुका पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. बी. बी. कोंडसकोप, क्रीडा शिक्षक श्री. पी. एम. पाटील आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *