Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

पंडित दीनदयाळ उपाध्याय : एकात्म मानवतावादाचे प्रवर्तक

  भारतीय राजकारणात, समाजजीवनात व विचारविश्वात पंडित दीनदयाळ उपाध्याय हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व मानले जाते. अल्पायुष्यात त्यांनी जे विचार मांडले ते आजही देशाच्या राजकीय व सामाजिक प्रवाहाला दिशा देत आहेत. जन्म व बालपण 25 सप्टेंबर 1916 रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान या गावी त्यांचा जन्म झाला. लहानपणीच आई-वडिलांचे …

Read More »

नवहिंद को-ऑप क्रेडिट सोसायटी (आंतरराज्य) लि, येळ्ळूरची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

  सभासदांना 12% लाभांश, चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांची माहिती येळ्ळूर : दि. 22/9/2025 नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संचलित नवहिंद को-ऑप क्रेडिट सोसायटीची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नवहिंद भवन येळ्ळूर येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर होते. प्रारंभी नवहिंदचे क्रीडा केंद्राचे सेक्रेटरी श्री. आनंद पाटील यांनी …

Read More »

दुर्गामाता महिला मंडळांमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत जनजागृती

  समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांचा पुढाकार बेळगाव : कर्नाटक सरकारतर्फे २२ सप्टेंबरपासून राज्यात जातनिहाय जनगणना सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिकांनी जनगणना फॉर्म भरताना धर्म – हिंदू, जात – मराठा, उपजात – कुणबी आणि मातृभाषा – मराठी असा तपशील नोंदवावा, याबाबत सकल मराठा समाजातर्फे जनजागृती मोहीम राबवली …

Read More »

विविध कार्यक्रमांनी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : मराठा सेवा संघ बेळगांव जिल्ह्याच्या 7 व्या आणि मराठा सेवा संघ भारतच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त गडहिंग्लजचे प्रा. पी. डी. पाटील यांचे व्याख्यान, भव्य वक्तृत्व स्पर्धा आणि मराठा समाज स्नेहमिलन मेळावा असा संयुक्त कार्यक्रम येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे उत्साहात पार पडला. शिवाजी विद्यालय येळ्ळूर बेळगांव येथे …

Read More »

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला दुहेरी मुकुट

  बेळगाव : अनगोळ, बेळगाव येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या विद्याभारती अखिल भारतीय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विजेतेपदासह दुहेरी मुकुट संपादन केला आहे. त्यामुळे या संघांची रांची झारखंड येथे होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली …

Read More »

पद्मभूषण पुरस्कार विजेते, ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

  बंगळूर : कन्नड सारस्वताच्या जगतात सरस्वती पुत्र म्हणून ओळखले जाणारे आणि प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. एस. एल. भैरप्पा (वय ९४) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते. बंगळूर शहरातील राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला यश न आल्याने …

Read More »

बेळगाव ग्रामीणचे ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम यांची काडा अध्यक्षपदी निवड

  बेळगाव : बेळगावचे ज्येष्ठ काँग्रेस नेते युवराज कदम यांची काडा अध्यक्षपदी निवड करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला आहे. युवराज कदम यांनी याआधी बुडा अध्यक्ष पदाचा देखील कार्यभार सांभाळला होता. ते बेळगाव उचगाव भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. मागील कार्यकाळात त्यांनी बेळगाव एपीएमसीचे देखील अध्यक्षपद बजावले होते त्यामुळे बेळगावच्या राजकारणाचा …

Read More »

कपिलेश्वर मंदिराच्या माजी पुजाऱ्याच्या मुलाची नैराश्येतून आत्महत्या!

  बेळगाव : शहरातील कपिलेश्वर मंदिराच्या माजी अध्यक्ष पुजारी यांच्या मुलाने मोबाईलमध्ये “डेथ नोट” लिहून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कपिलेश्वर रोड येथील एका घरात घडली आहे. सिद्धांत पुजारी (वय 27) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. मागील तीन वर्षांपूर्वी सिध्दांत याच्यावर खोट्या बलात्काराचा गुन्हा नोंद केला होता या नैराश्येतून त्याने …

Read More »

अंमली पदार्थ सेवन आणि मटका अड्ड्यावर बेळगाव पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव तालुक्यात हिरेबागवाडी पोलिसांनी गांजा सेवन करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. याशिवाय, बेळगाव ग्रामीण पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. बेळगावमधील तारीहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामापूर गल्ली येथील रहिवासी सोमनाथ रमेश कल्लन्नवर (२४) याला गांजा सेवन केल्याच्या आरोपाखाली हिरेबागवाडी पोलिसांनी अटक केली …

Read More »

रोहित मगदूम याची सैन्यात लेफ्टनंटपदी अभिनंदनीय निवड

  बेळगाव : एसएससी तांत्रिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या हुक्केरी (जि. बेळगाव) तालुक्यातील बेळवी गावातील रोहित शिवनगौडा मगदूम याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड झाली असून त्यामुळे बेळगावचे नांव उंचावले आहे. बेळगावच्या केएलएस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (जीआयटी) संगणक विज्ञानात बीटेक पूर्ण करणारा रोहित 29 सप्टेंबर 2025 रोजी गया येथील …

Read More »