Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

शिवजयंती मिरवणूक डाॅल्बीमुक्त करण्याचा मंडळांचा निर्णय; मार्केट पोलिस ठाण्यात बैठक

  बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवारी दि. 27 मे रोजी उत्साहात साजरा होणार आहे. मिरवणुकीत कुणीही डाॅल्बी लावणार नाही, असा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केला. पोलिस प्रशासनानेही डाॅल्बीऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, अशा सूचना दिल्या. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता मार्केट पोलिस ठाण्यात शिवजयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांंसोबत बैठक झाली. हा …

Read More »

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार

  बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी घनकचरा विल्हेवाट युनिटसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध कामांसाठी तातडीने निविदा मागवून कामाला सुरुवात करावी, काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने बिल अदा करावे, अशा …

Read More »

जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाची बैठक संपन्न

  बेळगाव : पावसाळा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारची प्राणहानी होणार नाही या दृष्टीने खबरदारी घेत योग्य त्या उपाययोजना राबवा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज सोमवारी आयोजित जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या सभेप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते …

Read More »

भारत विकास परिषदेतर्फे दहावी-बारावीत शहरात प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी सन्मानित

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान रविवारी सायंकाळी जी. जी. सी. सभागृहात आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून जी. एस्. एस्. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे उपस्थित होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी सहसचिव विनायक …

Read More »

केएसआरटीसी बस- कार यांच्यात भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी

  कागवाड : कागवाड तालुक्यातील ऊगार बुद्रुक गावाजवळ केएसआरटीसी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. सदर घटना मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर घडली असून या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाराष्ट्रातील मिरज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाच जणांची …

Read More »

तीन दिवसांत कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप एकदाच : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

  बंगळूर : दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार दि. 26 किंवा 27 तारखेला होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यानंतरदेखील नूतन मंत्र्यांच्या खातेवाटपाला विलंब होत आहे. दुसर्‍या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना खातेवाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार …

Read More »

सिद्धरामय्या सरकारच्या तिजोरीवर किती हजार कोटींचा बोजा?

  बंगळुरू : सिद्धरामय्या यांनी मागील आठवड्यात शनिवारी म्हणजेच 20 मे रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी ते दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने जनतेला अनेक आश्वासनं दिली होती. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होताच ती आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहेत. सरकार सत्तेवर येताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …

Read More »

हिजाब बंदी काँग्रेस हटवणार? : मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा

  बंगळुरू : कर्नाटक निवडणुकांपूर्वी हिजाब बंदीचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर निवडणुकीतही भाजपनं ️हिजाबचा मुद्दा लावून धरला होता. कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवाच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण ‘हिजाब वाद’ हेदेखील असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशातच कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं असून आता काँग्रेसचं नवनिर्वाचित सरकारही स्थापन झालं आहे. अशातच ज्या …

Read More »

बंगळुरूमधील मुख्यमंत्र्यांसाठीचे ‘झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल’ मागे घेण्याचे सिद्धरामय्यांचे आदेश

  बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सिद्धरामय्या ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी कामांचा सपाटा लावला आहे. नवनिर्वाचित सिद्धरामय्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी सर्वात आधी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यानंतर रविवारी (21 मे) रोजी त्यांनी एक विशेष आदेश जारी केला. ज्यामध्ये …

Read More »

राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरीला

  बेळगाव : राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. अज्ञातांनी सध्या गावातील नागरिक यात्रोत्सवात गुंतल्याचा फायदा घेत दान पेटी तोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे. त्यामध्ये जवळपास 30 ते 40 हजार रूपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी गावात यात्रोत्सव मोठ्या …

Read More »