Sunday , September 20 2026
Breaking News

केएसआरटीसी बस- कार यांच्यात भीषण अपघात; पाच जण गंभीर जखमी

Spread the love

 

कागवाड : कागवाड तालुक्यातील ऊगार बुद्रुक गावाजवळ केएसआरटीसी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली.
सदर घटना मिरज-जमखंडी राज्य महामार्गावर घडली असून या अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाराष्ट्रातील मिरज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कारमधील प्रवासी कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी कागवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *