Sunday , July 26 2026
Breaking News

हिजाब बंदी काँग्रेस हटवणार? : मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा

Spread the love

 

बंगळुरू : कर्नाटक निवडणुकांपूर्वी हिजाब बंदीचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर निवडणुकीतही भाजपनं ️हिजाबचा मुद्दा लावून धरला होता. कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवाच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण ‘हिजाब वाद’ हेदेखील असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशातच कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं असून आता काँग्रेसचं नवनिर्वाचित सरकारही स्थापन झालं आहे. अशातच ज्या मतदारसंघातून हिजाब वादाला सुरुवात झालेली, त्या भागातून निवडून आलेल्या कर्नाटकातील एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी हिजाब वादासंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी हिजाब वादाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेस हिजाबवरील बंदी हटवेल. यासोबतच मुस्लिमांना मिळणारं आरक्षण काँग्रेस पुन्हा लागू करेल, असंही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, कर्नाटक निवडणुकांपूर्वी भाजपनं मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करून लिंगायत आणि वोक्कलिगा समाजाचा आरक्षणाचा कोटा वाढवला होता.

द क्विंटमधील वृत्तानुसार, काँग्रेसच्या एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी यापूर्वी देखील CAA आणि NRC विरोधात अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे आपली मतं मांडली आहेत. यामागील कारणंही अत्यंत महत्त्वाचं होतं. भाजपनं कर्नाटक निवडणुकीत हिजाबबंदीचा मुद्दा लावून धरला होता. तसेच, हिजाब वादाला गुलबर्गामधूनच सुरुवात झाली होती. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *