Monday , September 21 2026
Breaking News

राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरीला

Spread the love

 

बेळगाव : राजहंसगड किल्ल्यावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील दान पेटी चोरल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. अज्ञातांनी सध्या गावातील नागरिक यात्रोत्सवात गुंतल्याचा फायदा घेत दान पेटी तोडून त्यातील रक्कम लंपास केली आहे. त्यामध्ये जवळपास 30 ते 40 हजार रूपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी गावात यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सव काळात सर्व गावकरी यात्रा करण्यात दंग होते, त्याचबरोबर गडावरील पोलीस बंदोबस्त हटवून गावात तैनात करण्यात आला होता. याचा फायदा घेत अज्ञातानी दान पेटी तोडून त्यातील रक्कम हडप केली आहे. सध्या गडावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य मुर्ती बसविण्यात आली आहे. तसेच गडावर सुशोभीकरण करण्यात आले आहे, यामुळे याठिकाणी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. गडावरील दान पेटी चोरीस गेल्याने गावात तसेच परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून पोलीसांनी तातडीने चोरट्यांना ताब्यात घ्यावे अशी मागणी होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *