बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी गावातील अरबाज रफिक मुल्ला या युवकाचा प्रशांत व प्रसाद नामक युवकांनी ‘बर्थ डे पार्टी करूया ये’ असे सांगून घरातून बोलावून नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवत आरोपींना अटक केली आहे. मात्र या आरोपींना फाशीची …
Read More »LOCAL NEWS
मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी येथे तरूणाचा निर्घृण खून
बेळगाव : अमावस्येनिमित्त मंदिरात आलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात घडली. शंकर सिद्धप्पा जगमट्टी (२७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमावस्येनिमित्त हे जोडपे बनसिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले. पाच-सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या शंकर सिद्धप्पा जगमट्टी याची मंदिर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली …
Read More »बॅंक खात्याला आधार लिंक गरजेचे!
बेळगाव : राज्य सरकारने अन्नभाग्य योजना जारी केली आहे. या अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांला 170 रु. शासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय झाली आहेत. तर काही लाभार्थ्यांची बँक खातीच नाहीत अश्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजना पोचविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम लाभार्थ्यांनी 20 जुलै पूर्वी बँक …
Read More »आनंदनगर येथे श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती
बेळगाव : आनंदनगर, दुसरा क्रॉस येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळच्यावतीने श्रमदानातून खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच सार्वजनिक बोअरची मोटर सुद्धा दुरुस्त करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. सध्याच्या पावसाळ्यामध्ये वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सोयीचे व्हावे यासाठी प्रशासनावर विसंबून न राहता छ. शिवाजी युवक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतःच श्रमदानाने …
Read More »समर्थनगर येथे डेंग्यू- चिकूणगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर
बेळगाव : समर्थनगर येथील श्री एकदंत युवक मंडळ यांच्यावतीने आणि डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या सहकार्याने डेंग्यू आणी चिकूणगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन केल्यानंतर श्रीफळ वाढवून शिबिराला चालना देण्यात आली. यावेळी समर्थ नगर मलिकार्जुन नगर भागातील नागरिकांना डेंग्यू आणी चिकूणगुनिया …
Read More »पाईपलाईन घालण्यासाठी खोदण्यात आलेल्या चरित अडकून गाईचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : पाण्याची पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याकडेने खोदण्यात आलेल्या मोठ्या चरित कोसळून अडकून पडलेल्या दोन गाईंपैकी एका गाईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म जवळ आज सकाळी घडली. गणेशपुर रोडवरील मिलिटरी फार्म समोरील रस्त्याच्या कडेने मोठी पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोल मोठी चर खोदून ठेवण्यात …
Read More »सुनेचा छळ केल्याच्या आरोपातून सासूची निर्दोष मुक्तता
बेळगाव : सुनेला शारिरीक व मानसिक त्रास करून माहेरीहून पैसे घेऊन ये म्हणून तगादा लावत मारहाण करुन घरातून हाकलल्याच्या प्रकरणातून साक्षीदारातील विसंगतीमुळे आरोपी सासूची बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता केली आहे. याबाबतची माहिती अशी की, किणये (ता. जि. बेळगांव) येथील दोन अपत्ये असलेल्या अनुराधा अमोल डुकरे (वय …
Read More »प्रख्यात गायक पंडित कैवल्य कुमार यांच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध!
बेळगाव : के एल एस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे किराणा घराण्याचे प्रख्यात गायक पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या भक्तीसुगंध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राग आणि विविध भजने सादर करून कैवल्य कुमार यांनी आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पंडित कैवल्यकुमार यांनी आपल्या मैफिलीची सुरुवात रूपक तालातील गौड मल्हार रागाने …
Read More »मित्रांनीच केला मित्राचा खून!
बेळगाव : हुंचेनहट्टी येथे काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेली अरबाज रफिक मुल्ला या युवकाच्या खुनाची घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याचे स्पष्ट झाले असून मित्रांनीच अरबाजला पार्टीसाठी नेऊन त्याचा खात्मा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयीतांना ताब्यात घेतले आहे. प्रसाद नागेश वडर (रा. जन्नतनगर, पिरनवाडी) आणि प्रशांत रमेश कर्लेकर (रा. सिद्धेश्वर गल्ली, …
Read More »१३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदारला कांस्य
बेळगाव : मालदिव येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदार या व्यायामपटुने कांस्यपदक मिळवून भारताचा तिरंगा फडकविला. दि. ५ ते ९ जुलैपर्यंत झालेल्या या स्पर्धेत ६५ किलो वजन गटात व्यंकटेशने तिसरा क्रमांक मिळविला. बेळगावच्याच प्रविण कणबरकरने ७० किलो गटात चौथा क्रमांक पटकावला. प्रशिक्षक प्रसाद बसरीकट्टी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta