Tuesday , April 21 2026
Breaking News

‘चलो मुंबई’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती म. ए. समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना

Spread the love

 

बेळगाव (प्रतिनिधी) : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवार दि. २८ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘चलो मुंबई’ मोर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी दुपारी म. ए. समितीचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले. मोर्चाच्या पूर्वतयारीसह हे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील मंत्री, महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले सीमा समन्वयक मंत्री, यांच्याशिवाय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात ऍड. एम. जी. पाटील, शिवाजी सुंठकर, सुनील अष्टेकर, विकास कलघटगी, आर. आय. पाटील आणि महादेव मंगाणकर यांचा सहभाग आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *